नीरज हातेकर घेणार स्वेच्छानिवृत्ती

 Mumbai
नीरज हातेकर घेणार स्वेच्छानिवृत्ती
Mumbai  -  

मुंबई विद्यापीठावरची संकटं संपता संपत नाहीत असंच सध्याचं चित्र आहे. ३१ जुलैची डेडलाईन पाळण्यासाठी विद्यापीठात शर्थीचे प्रयत्न होत आहेत. मात्र सर्व परीक्षांचे निकाल लावणं शक्य झालेले नाही. असे असतानाच विद्यापीठाच्या अडचणीत आणखी एक वाढ झाली आहे. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नीरज हातेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारण्याचा निर्णय घेतलाय. 'विद्यापीठातील समस्या, म्हणजे उपयोगात न येणारा लढा' असे म्हणत त्यांनी सोशल मिडीयावर स्वेच्छा निवृत्ती जाहीर केली आहे.


काय आहे नेमकी पोस्ट

मुंबई विद्यापीठात सध्या जे काही सुरू आहे, त्यामुळे मनाला प्रचंड वेदना होत आहेत. मुंबई विद्यापीठाबद्दल ज्यांना आत्मीयता आहे, त्यांनी एकत्र येऊन पावलं उचलण्याची वेळ आली आहे. यासाठी ज्यांची इच्छा असेल, त्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन संयुक्त कृती समितीकडून करण्यात येत आहे. शांतपणे बसून राहण्याचे दिवस आता गेले आहेत. मी स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका असंवेदनशील आणि कणा नसलेल्या व्यवस्थेमध्ये राहण्यापेक्षा त्या व्यवस्थेबाहेर राहूनच ती बदलण्याचा लढा मी देऊ शकतो.


वाद आला चव्हाट्यावर

या आधीही डॉ. नीरज हातेकर यांनी फेसबुकवर पोस्ट करून, विद्यापीठात सध्या सुरू असलेला वाद चव्हाट्यालर आणलेला. त्यात त्यांनी विद्यापीठात प्राध्यापकांना कशाप्रकारे धमकी दिली जाते? कोणत्या परिस्थिती प्राध्यापक सध्या उत्तरपत्रिका तपासत आहेत? याविषयी पोस्ट लिहिली होती.हेही वाचा

मुंबई विद्यापीठाच्या निकालाचे तीनतेराLoading Comments