मुंबई विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन

 Mumbai
मुंबई विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन
Mumbai  -  

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल जाहीर करण्याच्या शेवटच्या दिवशीच मुंबई विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन झाल्याने ऑनलाईन पेपर तपासणीची प्रक्रिया ऐनवेळी ठप्प झाली. यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यात आणखी उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्व्हर डाऊन कुठल्या कारणामुळे झाला याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. 

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाला रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलै ही शेवटची डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन संपत आलेली असतानाच विद्यापीठावर सर्व्हर डाऊन होण्याची नामुष्की ओढावली आहे.

मुंबई विद्यापीठाला ४७७ निकालांपैकी केवळ १५३ निकाल लावण्यात यश आले असून अद्याप ३ लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणे बाकी आहे. अशा स्थितीत शेवटच्या दिवशी उत्तरपत्रिका तपासणीचा अतिरिक्त ताण सर्व्हरवर आल्याने मुंबई विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

निकालांची डेडलाईन पाळण्यात नापास झालेले मुंबई विद्यापीठ आता सर्व्हरचा घोळ सुधारून कधीपर्यंत निकाल लावतेय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.हे देखील वाचा -

मुंबई विद्यापीठाच्या निकालाचे तीनतेरा

पेपर तपासणीचा वाद आला चव्हाट्यावर...Loading Comments