Advertisement

पेपर तपासणीचा वाद आला चव्हाट्यावर...


पेपर तपासणीचा वाद आला चव्हाट्यावर...
SHARES

३१ जुलैची डेडलाईन पाळण्यासाठी विद्यापीठात धावपळ सुरू आहे. आठवडाभर महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. उत्तरपत्रिका तपासणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अनेक अडचणींचा सामना करत प्राध्यापक पेपर तपासणी करत आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासन आणि प्राध्यापकांमधला विसंवाद आणि त्यातून निर्माण होणारा वाद आता चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. विद्यापीठाचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, विनायक दळवी प्राध्यापकांना धमकी देत असल्याचा खळबळजनक आरोप माजी प्राध्यापक नीरज हातेकर यांनी केला आहे. तशी फेसबुक पोस्टच त्यांनी टाकली आहे.



काय लिहिलंय पोस्टमध्ये?

'सध्या मुंबई विद्यापीठाने स्वत:ला ज्या अडचणीत टाकले आहे, त्यातून विद्यापीठाला बाहेर काढण्यासाठी प्राध्यापक कसोशीने प्रयत्न करत आहेत. विद्यापीठात असलेल्या सॉफ्टवेअरचा सुमार दर्जा, अपुऱ्या साधन-सुविधा आणि संवादाचा अभाव यामुळेच ही सगळी समस्या उद्भवली आहे. प्राध्यापक तर विद्यापीठाला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यापीठाचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी विनायक दळवी मात्र काम न केल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्याची धमकी प्राध्यापकांना देत आहेत. किमान 40 तास लॉगइन न करु शकलेल्या प्राध्यापकांना ही धमकी देण्यात येत आहे. पण विनायक दळवींमुळे नसून प्राध्यापकांमुळेच परिस्थितीवर काही अंशी नियंत्रण मिळवता आले आहे. काहीही झालं, तरी विनायत दळवींना कुणावरही कारवाई करण्याचा अधिकार नाही. दळवींना ही बाब लवकर समजेल अशी आशा.'

दरम्यान, या सर्व प्रकरणामुळे विद्यापीठातील कारभारात असलेला विसंवाद समोर येऊ लागला आहे. त्यामुळे निकाल वेळेवर लागेल की नाही, असा प्रश्नही विद्यार्थ्यांसमोर पुन्हा उभा राहिला आहे.


'त्या' प्राध्यापकांवर कारवाई होणार

24 ते 27 जुलै या चार दिवसांच्या सुट्टीत किमान 40 तास लॉगइन करणे प्राध्यापकांना बंधनकारक होते. या कालावधीत अनेक प्राध्यापकांनी लॉगइनच केलेले नाही. हे विद्यापीठाच्या लक्षात येताच शुक्रवारपासून आशा प्राध्यापकांना करणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे.



हे ही वाचा

आम्ही अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा? प्राध्यापक चिंतेत...


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा