आम्ही अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा? प्राध्यापक चिंतेत...

  Mumbai
  आम्ही अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा? प्राध्यापक चिंतेत...
  मुंबई  -  

  31 जुलैची डेडलाईन पाळण्यासाठी कुलगुरू संजय देशमुख यांनी प्राध्यापकांना चांगलेच वेठीस धरले आहे. 24 ते 31 जुलै महाविद्यालयांना सुट्टी दिल्यानंतर ती सुट्टी कायम ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. मात्र महाविद्यालयांना एवढी मोठी सुट्टी दिल्यामुळे अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार असा प्रश्न प्राध्यापकांना भेडसावत आहे.

  मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल 31 जुलैपर्यंत लागावेत अशी तंबी कुलपती सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरुंना दिली. त्यांनतर विद्यापीठाने सुरुवातीला 24 ते 27 जुलै विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना सुट्टी देऊन प्राध्यापकांना पेपर तपासणीच्या कामाला जुंपले. 25 जुलैला 1 लाख पेपर तपासणीही झाली. मात्र दरदिवशी दीड लाख पेपर तपासणी हे विद्यापीठाचे टार्गेट आहे. 31 जुलैपर्यन्त सर्व निकाल लावायचे आहेत. त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालयांच्या सुट्टीत वाढ केली आहे. मात्र या निर्णयामुळे प्राध्यापक नाराज झाले आहेत. महाविद्यालयाच्या सुट्टीत वाढ केल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा? असा प्रश्न प्राध्यापकांना भेडसावतोय.


  महाविद्यालयांच्या सुट्टीत वाढ केली असली, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. महाविद्यालयाच्या इतर सुट्ट्या कमी करून हे दिवस भरून काढले जातील.

  एम. ए. खान, कुलसचिव

  त्या प्राध्यापकांवर कारवाई होणार

  24 ते 27 जुलै या चार दिवसांच्या सुट्टीत किमान 40 तास लॉगइन करणे प्राध्यापकांना बंधनकारक होते. या कालावधीत अनेक प्राध्यापकांनी लॉगइनच केलेले नाही. हे विद्यापीठाच्या लक्षात येताच शुक्रवारपासून आशा प्राध्यापकांना करणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे.


  विद्यार्थी संघटना झाल्या आक्रमक

  31 जुलैची डेडलाईन जर विद्यापीठाने पाळली नाही, तर आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय विद्यार्थी संघटनांनी घेतला आहे. 31 जुलैला निकाल जाहीर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी विद्यापीठाला दिला आहे. या आधीही विद्यार्थी संगटनांनी कुलगुरूंची निकालाबाबत भेट घेतली होती. कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनादरम्यान जोर धरणार आहे.  हे ही वाचा

  तावडेंचे कुलगुरुंवर कारवाईचे संकेत

  'परीक्षांचे निकाल लावा, अन्यथा आंदोलन करु'


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.