Advertisement

कुलगरुंवर कारवाईचे तावडेंचे संकेत


कुलगरुंवर कारवाईचे तावडेंचे संकेत
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपसणीच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. त्यावर बुधवारी विधान परिषदेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर कारवाईचे संकेत दिले. युवा सेनेच्या माध्यमातून पेपर फेरतापसणीच्या शुल्काबाबत सूचना आल्या. त्यावर आदराने विचार केला जाईल. कुलगुरूंची सविस्तर चौकशीही केली जाईल. पण त्यापूर्वी कोणावरही बोट ठेऊन चालणार नाही. 31 जुलैनंतरच कोण बरोबर आणि कोण चूक याची चर्चा व्हावी, असे म्हणते त्यांनी शिवसेनेच्या आरोपाला उत्तर दिले. 

प्रधान सचिव आणि राज्यपालांचे सचिव रोज जाऊन पाहणी करत आहेत. पेपर तपासण्याचा स्पीड वाढला तरी गुणवत्ता कमी पडू देणार नाही. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वेळेत मिळावी यासाठी देखील मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. त्यामुळे एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.


विद्यापीठाच्या निकालावर तावडेंचा विधान परिषदेत खुलासा

  • अजून 61,992 उत्तर पत्रिकांची तपासणी शिल्लक
  • कॉमर्स - 3 लाख 75 हजार
  • लॉमध्ये सुमारे 40 हजार पेपर तपासणी शिल्लक
  • कॉमर्स, लॉ आणि मॅनेजमेंट हे पेपर तपासणे जिकरीचे
  • मॅनेजमेंट 28 हजार पेपर शिल्लक
  • 70 टक्के उत्तर पत्रिका तपासून झाल्या



45 दिवसांत निकाल अपेक्षित असतो - अनिल परब

45 दिवसांत निकाल अपेक्षित असतो, पण तो अजूनही लागलेला नाही. युनिव्हर्सिटीअॅक्ट बंद झाल्याने हा गोंधळ झाला की काय? असा प्रश्न शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विचारला. पेपर तपासणीला गुणवत्ता हवी. घाईघाईत पेपर तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. यावेळी त्यांनी कुलगुरूंवर कारवाई होणार का? असा प्रश्नही बुधवारी विधान परिषदेत उपस्थित केला.


कुलगुरुंवर कोणती कारवाई करणार? - गोऱ्हे

यावर्षी विद्यापीठाच्या गैरकारभारामुळे रिचेकिंगचे 600 रुपये माफ कराल का? मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेत लागत नाहीत, त्यामुळे कुलगुरुंवर कोणती कारवाई करणार? संजय देशमुख यांच्यावर काय कारवाई करणार? असे प्रश्न नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तावडेंना विचारले.


एका दिवसात 1 लाख 10 हजार 330 उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण

मुंबई विद्यापीठाने 31 जुलैची डेडलाईन पाळण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत तब्बल 1 लाख 10 हजार 330 उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या. रखडलेले निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करावेत, अशी तंबी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना दिली आहे. त्यामुळे विद्यापीठाने प्राध्यापकांना वेठीस धरले आहे.

मुंबई विद्यापीठाने संलग्नित कॉलेजेसला चार दिवसांची सुट्टी जाहीर केली. त्यात सोमवारी सर्व्हर डाऊन असल्यामुळे पेपर तपासणी खोळंबली. पण मंगळवारी विक्रमी उत्तरपत्रिका तपासणी झाल्यामळे विद्यापीठाला हायसे वाटले आहे. कॉलेजेसना देण्यात आलेल्या 4 दिवसांच्या सुट्टीमुळे मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुमारे 1 लाख उत्तरपत्रिकांची तपासणी झाली. त्यामुळे अनेक लहान अभ्यासक्रमांच्या निकालाचे काम पूर्ण झाले. बुधवारपासून निकालाबाबत घोषणा करण्यात येईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारी एकूण 5 हजर 358 प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम केले. या प्राध्यापकांनी संध्याकाळपर्यंत 1 लाख 5 हजार 491 उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण केली आहे.


पुणे आले धाऊन

उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी पुणे विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या मदतीला धावून आले आहे. पुणे विद्यापीठाचे विशेष अधिकारी ललित पवार हे इतर प्राध्यापकांसह मुंबई विद्यापीठात दाखल झाले आहेत.


'कुलगुरूंनी तातडीने राजीनामा द्यावा'

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे निकाल रखडणे ही जबाबदारी पूर्णतः कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची आहे. ही जबाबदारी स्वीकारून कुलगुरूंनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर विद्यापीठातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावी. या प्रक्रियेमधील कंपनी बदलावी, उत्तर पत्रिका तपासणीला इतका विलंब झाल्यामुळे याची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी मुणगेकर यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. 1 जुलैची डेडलाईन पळताना निकालाची गुणवत्ता घसरणार, अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली. पेपर तपासणीसाठी पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठाची मदत घेतल्यामुळे गोंधळ निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 


हेही वाचा -
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची 'वटवावटवी'!

आदित्य ठाकरे म्हणतात, 'तावडे आणि कुलगुरुंनी राजीनामा द्यावा'!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा