Advertisement

१५ ऑगस्टची डेडलाईन पाळणंही अशक्यच ?


१५ ऑगस्टची डेडलाईन पाळणंही अशक्यच ?
SHARES

मुंबई विद्यापीठाला विविध शाखांचे रखडलेले निकाल लावण्यासाठी यापूर्वी दिलेल्या दोन डेडलाईन उलटून गेल्यानंतर आता तिसरी डेडलाईनही चुकते की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई विद्यापीठाला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी निकाल लावण्यासाठी सर्वात पहिल्यांदा ३१ जुलैची डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन पाळता न आल्यामुळे राज्यपालांनी विद्यापीठाला पुन्हा ५ ऑगस्टची डेडलाईन दिली. मात्र ही डेडलाईन पाळण्यातही विद्यापीठ नापास झाले. त्यानंतर खुद्द कुलगुरूनींच मुंबई विद्यापीठाचे निकाल लावण्यासाठी १५ ऑगस्ट उजाडेल, असे सांगितले होते. पण ही तिसरी डेडलाईनही चुकते की काय अशी शंका आता येऊ लागली आहे.

या मागचे कारण म्हणजे ११ ऑगस्ट उजाडला तरी केवळ ३०७ निकालच जाहीर झाले आहेत. त्यात आर्ट्स १२७, कॉमर्स १३, सायन्स २३, मॅनेजमेंट २४, टेक्नॉलॉजी ११९ आणि लॉ च्या केवळ १ निकालाचा समावेश आहे.


१५० हून अधिक निकाल बाकी

कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी स्वत: १५ ऑगस्टची डेडलाईन जाहीर केली होती. पण ही डेडलाईन पाळण्याऐवजी देशमुख अचानक सुट्टीवर गेल्याने राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाचा अतिरीक्त कारभार कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सोपवला आहे.

त्याचप्रमाणे बरेच दिवस रिक्त असेलेल्या प्र-कुलगुरूपदाचा भार 'व्हिजेटीआय'चे संचालक धीरेन पटेल यांच्याकडे सोपवला आहे. हे दोघेही मिळून १५ ऑगस्टपर्यंत रखडलेले निकाल कसे लावतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे कारण अद्याप १५० हून अधिक परीक्षांचे निकाल लागायचे बाकी आहेत. यात प्रामुख्याने कॉमर्स आणि लॉच्या निकालांचा समावेश आहे. कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विद्यापीठाने सी.ए. ची मदत घेण्याचे ठरविले आहे.


डॉ. संजय देशमुख रजेवर गेल्याने सध्या मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांची जबाबदारी माझ्यावर आहे. रखडलेले निकाल वेळेवर लावणे हे आमच्यापुढील आव्हान आहे. १५ ऑगस्टपर्यंत निकाल लागावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे



हे देखील वाचा -

31 जुलै ही मुदत कोणत्या आधारावर दिली? - मुणगेकर

विद्यापीठ निकालांवरुन राज्यपाल विरूद्ध कुलगुरू?


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा