31 जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल लावा - राज्यपाल

  Mumbai
  31 जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल लावा - राज्यपाल
  मुंबई  -  

  मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्याची दखल महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू सी. विद्यासागर राव यांनी घेतली आहे. त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना 31 जुलैपर्यंत सर्व प्रलंबित निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.


  477 पैकी 51 परीक्षांचे निकाल

  मुंबई विद्यापीठाने यावर्षी 477 परीक्षा घेतल्या आहेत. त्यापैकी केवळ 51 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. एवढेच नव्हे, तर 51 परीक्षांच्या निकालामध्ये केवळ 23 परीक्षांचे निकाल 30 दिवसांत घोषित झाले आहेत. 18 परीक्षांचे निकाल 45 दिवसांत घोषित झाले आहेत. तर उरलेल्या 10 परीक्षांचे निकाल 45 दिवसांनतर जाहीर करण्यात आले आहेत.


  नियमांचा भंग

  विद्यापीठ अधिनियमातील कलम 89 च्या तरतुदीनुसार परीक्षांचे निकाल परीक्षेनंतर 45 दिवसांच्या आत लावणे आवश्यक असते. तरीही या परीक्षांचे निकाल 45 दिवस उलटूनही लागलेले नाहीत.


  अहवाल सादर करण्याचे आदेश

  राज्यपालांनी या संदर्भात कुलगुरू संजय देशमुख यांना या विषयी अहवाल सादर करायला सांगितला आहे. राज्यपालांनी निकालाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासन प्रतिनिधी नियुक्त करण्याचेही आदेश दिले आहेत.

  निकाल उशीरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अडथळा निर्माण होतो. पालकांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे राज्यापालांनी 31 जुलै 2017 पर्यंत निकाल घोषित करायचे आदेश दिले आहेत.
  हे देखील वाचा -

  मुंबई विद्यापीठ करतंय तरी काय? २१० परीक्षांचे निकाल रखडले!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.