Advertisement

टीवायच्या निकालांसाठी 'टास्क फोर्स'


टीवायच्या निकालांसाठी 'टास्क फोर्स'
SHARES

उशीरा निकाल देण्यात पदवी मिळवणाऱ्या मुंबई विद्यापीठाचे निकाल या वर्षीपासून वेळेवर लागावेत यासाठी कुलगुरू संजय देशमुख यांनी उत्तरपत्रिकांचे ऑनलाईन असेसमेंट करण्याचे जाहीर केले. मात्र ऑनलाईन असेसमेंट करूनही टीवायचे निकाल रखडलेच. त्यामुळे टीवायचे निकाल लावण्यासाठी आता 'टास्क फोर्स' नेमण्याचा निर्णय देशमुख यांनी घेतला आहे. या विषयावर त्यांनी विद्यापीठ संलग्नित कॉलेजांच्या प्राचार्यांची विशेष बैठक बोलवली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


असेसमेंट प्रक्रियेला प्रतिसाद नाही

एका बाजूला ऑनलाईन असेसमेंट प्रक्रियेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, तर दुसऱ्या बाजूला प्राध्यापकही पेपर तपासणीसाठी पुढे येत नसल्यामुळे टीवायचा निकाल रखडला. निकाल रखडल्यानंतर विद्यार्थी संघटनानी विद्यापीठावर टीका करायला सुरूवात केली आहे. परिणामी यावर्षीही निकालासाठी ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे.


प्राध्यापकांकडे पेपर पाठवणे बंधनकारक

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कॉलेजच्या प्राचार्यांनी आपल्या प्राध्यापकांकडे पेपर तपासणीसाठी पाठवणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता टीवायचा निकाल कधी लागतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.



परीक्षा झाल्यानंतर आम्हाला ऑनलाईन असेसमेंट पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी होणार असे सांगण्यात आले होते. मात्र ही प्रणाली कोणत्या पद्धतीने चालणार याची माहिती आम्हाला नव्हती. कोणते उत्तर ग्राह्य धरले जाईल आणि कोणते उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही, याबाबत मनात शंका होती. आता ही प्रक्रीया रद्द झाल्यामुळे पुन्हा यावर्षी निकाल उशीराच लागणार असे दिसत आहे. मी बीएससीची विद्यार्थीनी आहे. मला पुढे जाऊन एमएससीला प्रवेश घ्यायचा आहे. त्यामुळे आता पुढच्या सगळ्याच प्रक्रियेला उशीर होणार. अर्ध वर्ष तर निकाल आणि एमएससीसाठी प्रवेश घेण्यातच निघून जाणार.
- तन्वी मुंडले, बीएससी विद्यार्थिनी



मुंबई विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे. पुढे शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठाने वेळेत निकाल जाहीर करणे अत्यंत गरजेचे आहे. एवढे करूनही ऑगस्टपर्यंत निकाल लागेल याची शाश्वती नाही. याची दक्षता विद्यापीठाने घेतलीच पाहिजे.
- रश्मी मुंडले, पालक


हे देखील वाचा -  

मुंबई विद्यापीठ करतंय तरी काय? २१० परीक्षांचे निकाल रखडले!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा