Advertisement

मुंबई विद्यापीठ करतंय तरी काय? २१० परीक्षांचे निकाल रखडले!


मुंबई विद्यापीठ करतंय तरी काय? २१० परीक्षांचे निकाल रखडले!
SHARES

नियमानुसार विद्यापीठ स्तरावरील परीक्षांचे निकाल 45 दिवसांत जाहीर होणे बंधनकारक आहे. मात्र मुंबई विद्यापीठाचे द्वितीय सत्रातील 210 परीक्षांचे निकाल 45 दिवसांनंतर लागल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना विद्यापीठाने दिली. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाकडे मार्च आणि ऑक्टोबर 2016 तसेच मार्च 2017 च्या परीक्षा आणि जाहीर केलेल्या निकालाची माहिती मागितली होती. त्यात मार्च 2016 आणि ऑक्टोबर 2016 या दरम्यान निकाल रखडण्यात 24 टक्यांची वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 30 दिवसांत 87 निकाल म्हणजे 24.22 टक्के निकाल जाहीर केले. यात 32 हे कला, विज्ञानाचे 14, अभियांत्रिकी 38 आणि विधीचे 4 निकाल होते. या निकालांचा यात समावेश आहे. त्यात वाणिज्य परीक्षेचा एकही निकाल नव्हता.  तर 45 दिवसांत 164 म्हणजे 38.8 टक्के निकाल जाहीर करण्यात आले. त्यात 32 कला, 4 वाणिज्य, 23 विज्ञान, 94 अभियांत्रिकी आणि 11 विधी परीक्षा निकालांचा समावेश आहे.

कुलगुरू यांचे लक्ष निकाल आणि विद्यापीठातील कामकाजाकडे नाही. ते देशांतर्गत आणि देशाबाहेर दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा नामांकन क्रमांक घसरला आहे. त्यामुळे मी शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रविंद्र वायकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 30 दिवसांच्या आत सर्व परीक्षेचे निकाल घोषित करण्यासाठी कुलगुरूंना आदेश देण्याची विनंती केली आहे. विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांना दुसरीकडे प्रवेश घ्यायचा आहे, ही चिंतेची बाब आहे.

- अनिल गलगली, आरटीआय कार्यकर्ते

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा