31 जुलै ही मुदत कोणत्या आधारावर दिली? - मुणगेकर

  Mumbai
  31 जुलै ही मुदत कोणत्या आधारावर दिली? - मुणगेकर
  मुंबई  -  

  कुलगुरूंनी ऑनलाइन असेसमेंटचा घेतलेला निर्णय अत्यंत अविवेकी आणि बेजबाबदार आहे. विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांमुळेच आज विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची जबाबदारी कुलगुरूंनी स्वीकारलीच पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे, अशा शब्दांत माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सध्याचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्यावर टीका केली आहे. कुलगुरुंच्या भूमिकेवर आक्षेप घेणारं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारं पत्रच मुणगेकरांनी लिहिलं आहे.

  मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाप्रकरणी माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी कुलपती सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. याआधी त्यांनी 'कुलगुरूंनी राजीनामा द्यावा', अशी मागणी केली होती.

  '4 जुलै रोजी तुम्ही कुलगुरूंना समज दिली होती, तेव्हाच उशीर झाला होता. त्या दिवसापर्यंत 18 लाख उत्तरपत्रिकाही तपासून झाल्या नव्हत्या? त्यामुळे 31 जुलै ही मुदत कोणत्या आधारावर दिली?' असा प्रश्न या पत्रातून त्यांनी उपस्थित केला आहे.

  मुंबई विद्यापीठाने पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका तपासण्याची शक्कल लढवताना राज्यपालांची परवानगी घेतली का? कुलगुरूंनी प्रकुलगुरूंची नेमणूक केली नाही, पूर्ण वेळ परीक्षानियंत्रक नेमला नाही, तेव्हाच का हस्तक्षेप केला नाही? असे अनेक प्रश्न मुणगेकरांनी उपस्थित केले आहेत.

  कुलगुरुंवर मुणगेकरांनी तोंडसुख घेतल्यानंतर ट्विटरवर त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि त्यांनाच प्रतिप्रश्न करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी विद्यापीठात सध्या सुरु असलेया आरोप-प्रत्यारोपांना राजकीय पार्श्वभूमी असल्याचंही म्हटलं आहे.   

  हेही वाचा -

  मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची 'वटवावटवी'!

  मुंबई विद्यापीठाच्या निकालाचे तीनतेरा  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.