डॉ. मुणगेकरांचा मोदी सरकारवर हल्ला

 Fort
डॉ. मुणगेकरांचा मोदी सरकारवर हल्ला

सीएसटी - 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर जनतेला मोठा त्रास झाला. याला मोदी सरकारच जबाबदार असल्याचं वक्तव्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केलंय. नोटा बंद केल्यानंतर गरीब जनतेला त्रास होऊ नये, यासाठी सरकारनं कोणतंही नियोजन केलेलं नाही, असंही त्यांनी म्हटलंय. मुंबई मराठी पत्रकार संघात ते बोलत होते. नोटा बंद करण्याआधी सरकारनं 100 रुपयांच्या पुरेशा नोटांची छपाई करून पर्यायी व्यवस्था करायला हवी होती. 100 रूपयांच्या पुरेशा नोटांची छपाई केली नाही, याला सरकार, अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर जबाबदार असल्याचंही त्यांनी म्हटलं. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करून 2000 रुपयांची नोट चलनात आणून काळा पैसा जमा करण्यास चालना देण्यात आली आहे. त्यामुळे 2 हजारांची नोट ताबडतोब बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली. नोटा बंद करून काळा पैसा बाहेर आल्याचे जगात एकही उदाहरण नाही. या देशातली राजकीय व्यवस्था काळ्या पैशाचं मुख्य उगमस्थान आहे, अशी टीकाही मुणगेकर यांनी केली.

Loading Comments