Advertisement

आता परीक्षेसाठी पुरवणी बंद


आता परीक्षेसाठी पुरवणी बंद
SHARES

ऑनलाइन असेसमेंटदरम्यान पुरवण्या गहाळ झाल्यामुळे, यापुढे परीक्षेत पुरवणी न देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. येत्या वर्षापासून परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयासाठी पुरवणी मिळणार नाही. असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

ऑनलाईन असेसमेंट दरम्यान उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना अनेक उत्तरपत्रिका या वेळी गहाळ झाल्या. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे निकाल रखडले. या गहाळ उत्तरपत्रिकांमुळे अनेक विद्यार्थ्यांना सरासरी गुण द्यावे लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ८० मार्कांचा पेपर सोडवायला 40 पानी उत्तरपत्रिका पुरेशी असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पुरवणी परीक्षेला पुरवणी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांना पत्र पाठवले आहे. द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना पुरवणी देण्यात येणार नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा