SHARE

मुंबई विद्यापीठातील निकाल रखडल्याप्रकरणी डाॅ. संजय देशमुख यांची अखेर कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आदेशानंतर डाॅ. देशमुख यांची गच्छंती करण्यात आली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ च्या ११(१४) (ई) या कलमांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली

आॅनस्क्रीन मार्किंग सिस्टीम राबवण्यात आलेलं अपयश आणि मुंबई विद्यापीठाच्या २०१७ सत्रातील परीक्षांचे निकाल नियमानुसार निर्धारीत मुदतीत जाहीर करण्यात दिरंगाई केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचं कारण राज्यपाल कार्यालयातून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलं आहे.   


'हे' कारण भोवलं

डाॅ. संजय देशमुख यांनी कुठलीही पूर्व तयारी न करता ऑनलाईन पेपर तपासणीचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यापीठाचे तब्बल ४५० शाखांचे निकाल रखडले. मुंबई विद्यापीठाने निकालासाठी तीन ते चार वेळा डेडलाईन दिली होती. मात्र तरीही निकाल लावण्यात विद्यापीठ प्रशासनाला अपयश आलं. अजूनही विद्यापीठात विद्यार्थ्यांचं निकालासाठी आंदोलन सुरूच आहे. 

विद्यापीठातील या गोंधळावरून राज्यपाल सी. विद्यासागर राव डाॅ. देशमुख यांच्यावर नाराज होते. अखेर सी. विद्यासागर राव यांच्या आदेशावरून संजय देशमुख यांची हकालपट्टी करण्यात आली.  


दरम्यान युवा सेना अध्यक्ष आदीत्य ठाकरे यांनी कुलगुरू म्हणून लायक व्यक्ती नेमावी असे ट्विट केले. 

<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="mr" dir="ltr">आता पुन्हा चूक नको, VC म्हणून एखादी लायक व्यक्ती नेमावी. Online assessment चा त्रास विद्यार्थी व शिक्षकांना देऊ नये. कार्यप्रणाली सुधारा!</p>— Aaditya Thackeray (@AUThackeray) <a href="https://twitter.com/AUThackeray/status/922862106558414853?ref_src=twsrc%5Etfw">October 24, 2017</a></blockquote>
<script async src="//platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या