सिनेट निवडणुकीसाठी मुंबई विद्यापीठ सज्ज

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • शिक्षण

सिनेट निवडणुकांसाठी मुंबई विद्यापीठ सज्ज झालं असून २५ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान ही निवडणूक पार पडणार अाहे. १० नोंदणीकृत जागांकरिता होणारी ही निवडणूक विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या महाविद्यालयांतील एकूण ५३ मतदान केंद्रावर होणार आहे.

किती उमेदवार?

अधिसभेवर १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता खुल्या प्रवर्गातून ३६, महिला प्रवर्गातून ०६, अनुसूचित जाती प्रवर्गातून ११, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ०४, भ. ज. प्रवर्गातून ०४ आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातून ०७ असे एकूण ६८ उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणात असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

मतमोजणी २७ मार्चला

२५ मार्च २०१८ रोजी आयोजित केलेल्या या मतदान प्रक्रियेत नोंदणीकृत पदवीधरांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आलं अाहे. नोंदणीकृत पदवीधर मतदार संघासाठीची मतमोजणी २७ मार्च २०१८ रोजी केली जाणार आहे.


हेही वाचा - 

इतिहासाची उकल करणार मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाचं डम्पिंग ग्राउंड झालंय- आव्हाड

पुढील बातमी
इतर बातम्या