Advertisement

इतिहासाची उकल करणार मुंबई विद्यापीठ

कार्बन डेटिंगसाठी एक्सीलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री (एएमएस) या कालमापन यंत्राची सुविधा ही बीआरएनएस प्रकल्पातील १० कोटी निधीच्या प्रकल्पातून तयार करण्यात आली असून यासाठी मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. डी.सी. कोठारी आणि टीआयएफआरमधील प्राध्यापक एम. एन. वाहिया यांच्या सहकार्याने ही सुविधा विद्यापीठात कार्यान्वित केली जात आहे.

इतिहासाची उकल करणार मुंबई विद्यापीठ
SHARES

संशोधनाला चालना देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एक पाऊल पुढं टाकलं आहे. नुकतंच विद्यापीठातील कार्बन डेटिंगसाठी एक्सीलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री (एएमएस) सुविधेचं उद्घाटन प्र. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. पुरातत्वशास्त्र आणि प्राचीन इतिहासाची उकल करण्यास हे यंत्र सज्ज असून ५० हजार वर्षापर्यंतच्या इतिहासाची अचूक नोंद घेऊन त्याची परिणामकारकता शोधून काढण्याची क्षमता या यंत्रात आहे.


नेदरलँडहून मुंबईत

भारतातील अत्यंत प्राचीन संस्कृती आणि मानवनिर्मित साहित्य, पुरातन काळातील अनेक बाबींबरोबरच बायोमेडिकल आणि अणूऊर्जेच्या संशोधनात हे यंत्र महत्वाची भूमिका बजावणार आहे. हे यंत्र नेदरलँड येथून मुंबई विद्यापीठात आणलं गेलं आहे.


निधी उपलब्ध

कार्बन डेटिंगसाठी एक्सीलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री (एएमएस) या कालमापन यंत्राची सुविधा ही बीआरएनएस प्रकल्पातील १० कोटी निधीच्या प्रकल्पातून तयार करण्यात आली असून यासाठी मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. डी.सी. कोठारी आणि टीआयएफआरमधील प्राध्यापक एम. एन. वाहिया यांच्या सहकार्याने ही सुविधा विद्यापीठात कार्यान्वित केली जात आहे.


देशातलं पहिलं विद्यापीठ

कालमापन यंत्र बसविणारं मुंबई विद्यापीठ देशातील पहिलं विद्यापीठ बनलं आहे. मुंबई विद्यापीठातील या प्रकल्पाचं वैशिष्ट्ये म्हणजे या सुविधेचा फायदा फक्त मुंबई विद्यापीठच नव्हे, तर सर्व भारतीय शास्त्रज्ञांना होणार आहे. आजमितीस कार्बन डेटिंगसाठीचे सॅम्पल परदेशात पाठविले जातात. ज्यासाठी जवळपास ६०० डॉलर्स इतका खर्च येतो. हे यंत्र भारतात आल्याने हा खर्च वाचणार आहे.


इतिहासाची उकल

भारत देशाला मोठा ऐतिहासिक वारसा आणि प्राचीन व समृद्ध परंपरा लाभली आहे. त्यादृष्टिने पुरातत्व आणि प्राचीन संस्कृती बरोबरच इतिहासाची उकल करण्यास येथील विद्यार्थी, संशोधकांना याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबई विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या या सुविधेचा फक्त पुरातत्त्वीय समुदायांच्या गरजा पूर्ण करणार नाही तर भूगर्भशास्त्र, वनस्पती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राबरोबरच इतिहासावर देशातील विविध भागांमध्ये परिमाणवाचक अभ्यासासाठी या सुविधेचा उपयोग होणार आहे.


मुंबई विद्यापीठाने टाकलेले हे एक ऐतिहासिक पाऊल असून यामुळे भारतीय पुरातत्व समुदायाचं स्वप्न सत्यात उतरणार आहे. त्यादृष्टिने पुरातत्व आणि प्राचीन संस्कृती बरोबरच इतिहासाची उकल करण्यास येथील विद्यार्थी, संशोधकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या यंत्राच्या सहाय्याने पुरातत्व शास्त्राशी निगडीत गरजा भागविण्यासाठी मुंबई विद्यापीठ सज्ज होत आहे.
– डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू (प्र), मुंबई विद्यापीठ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा