मुंबई विद्यापीठाचा नवा कारनामा, ३० परीक्षा तब्बल महिनाभर पुढे ढकलल्या!

मुंबई विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मुंबई विद्यापीठाने शनिवारी तब्बल ३० परिक्षांचे वेळापत्रक जवळपास एक महिनाभर पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. या परीक्षामंध्ये कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्ससह विविध शाखांचा समावेश आहे. नुकतेच विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर केले आहे. दरम्यान, परीक्षा लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांचे निकालही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. आधीच टॉप १०० विद्यापीठांच्या यादीतून मुंबई विद्यापीठ बाहेर पडल्यामुळे झालेल्या नामुष्कीत विद्यार्थ्यांच्या या नाराजीची आता भर पडणार आहे.

चूक विद्यापीठाची, त्रास विद्यार्थ्यांना

विद्यापीठाने घेतलेल्या आधीच्या परीक्षांचे काही निकाल नुकतेच लागले आहेत, तर काही निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच परिक्षा न घेता विद्यार्थ्यांना थोडा वेळ मिळावा, तसेच नवीन परीक्षांचा अभ्यासही विद्यार्थ्यांना करता यावा, यासाठी या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे विद्यापीठाकडून संगण्यात येत आहे. मात्र, आधीचे निकाल लावण्यात विद्यापीठाकडून झालेली दिरंगाई आता विद्यार्थ्यांना भोगावी लागणार आहे.

कोणत्या परीक्षा पुढे ढकलल्या?

मुंबई विद्यापीठाच्या सायन्स शाखेतील एमएससी (सेमिस्टर 1, सेमिस्टर 3), कॉमर्स शाखेतील बीकॉम (सेमिस्टर 5, सेमिस्टर 6) एमएमएम (सेमिस्टर 1) एमएचआरडीएम, एमएफएम, एमएफएसएम, तर आर्टस शाखेतील एमए, बीए, एमएडच्या परीक्षा जवळपास एक ते दीड महिना पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


हेही वाचा

अखेर मुंबई विद्यापीठाला कुलगुरू मिळणार!

पुढील बातमी
इतर बातम्या