Advertisement

अखेर मुंबई विद्यापीठाला कुलगुरू मिळणार!

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या १३ एप्रिलला मुंबईतील नरीमन पॉइंट येथील सिडको कार्यालयात कुलगुरू पदासाठी इच्छुक ३२ जणांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

अखेर मुंबई विद्यापीठाला कुलगुरू मिळणार!
SHARES

संजय देशमुख यांची हकालपट्टी झाल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाचे नवे कुलुगुरू कोण होणार? याबाबत सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या १३ एप्रिलला मुंबईतील नरीमन पॉइंट येथील सिडको कार्यालयात कुलगुरू पदासाठी इच्छुक ३२ जणांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.


कशी असेल निवड प्रक्रिया?

कुलगुरू पदासाठी १३ एप्रिल व १४ एप्रिल हे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. १३ एप्रिलला सिडको कार्यालयात मुलाखत घेण्यात येणार असून १४ एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत अंतिम पाच नावे राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर हे पाच जण राज्यपालांकडे सादरीकरण करतील आणि त्यानंतर राजभवनकडून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावांची घोषणा करण्यात येईल.


मुंबई विद्यापीठातील विभागप्रमुखही शर्यतीत?

मुंबई विद्यापीठातील निकाल गोंधळामुळे तत्कालीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतर नवीन कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या समितीकडे आलेल्या अर्जांच्या पार्श्वभूमीवर ३२ जणांना मुलाखतीसाठी पत्र पाठवण्यात आले होते. 

या समितीकडे आलेल्या अर्जांमध्ये कॉलेजच्या प्राचार्यांसह मुंबई विद्यापीठातील अनेक विभागप्रमुखांचाही समावेश आहे. त्याशिवाय नागपूर विद्यापीठातील काही प्राध्यापकांनीही कुलगुरूपदासाठी अर्ज केला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, कुलगुरू पदावर वर्णी लागण्यासाठी काही प्राचार्य थेट दिल्लीतही पोहोचले आहेत, तर काही माजी कुलगुरुंची मदत घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



हेही वाचा

कुणी कुलगुरू देतं का कुलगुरू...


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा