Advertisement

नियमावली बनवूनच करा चौकशी, नीरज हातेकर यांची मागणी


नियमावली बनवूनच करा चौकशी, नीरज हातेकर यांची मागणी
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. नीरज हातेकर यांच्या पीएचडीवरुन सुरू असलेल्या वादाला वेगळं वळण प्राप्त झालं आहे. वाड:मय चोरीबाबत कोणतीही नियमावली तयार नसताना चौकशी केलीच कशी? असा सवाल उपस्थित करुन डॉ. नीरज हातेकर यांनी चौकशी समितीवरच आक्षेप नोंदविला आहे. आधी नियमावली तयार करा आणि त्यानंतरच चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.

या मागणीसाठी राज्यपालांसह मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन दिल्याचं हातेकर यांनी सोमवारी जाहीर केलं. या संपूर्ण प्रकारात विद्यापीठाच्या कामकाजाबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आपणही या अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याचं नमूद केलं.


विद्यापीठाची नियमावली अद्याप नाही

याबद्दल बोलताना हातेकर म्हणाले की, ''विद्यापीठ अनुदान आयोगाने यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. मात्र विद्यापीठाने याबाबत नियमावली जाहीर केलेली नाही. त्यामुळे ही नियमावली जाहीर करुन मग विद्यापीठाने चौकशी करावी. काही जण जाणीवपूर्वक अशाप्रकारची तक्रार करीत असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण पुढील पाऊल टाकणार आहे. याविरोधात कोर्टात जाण्याचीही आपली तयारी आहे.''


काय आहे प्रकरण?

डॉ. नीरज हातेकर यांनी त्यांच्या पत्नीच्या शोधनिबंधातून मजकूर चोरुन पीएचडी पूर्ण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी डॉ. हातेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केलं होतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा