Advertisement

कुणी कुलगुरू देतं का कुलगुरू... विद्यापीठाची जाहिरात प्रसिद्ध


कुणी कुलगुरू देतं का कुलगुरू... विद्यापीठाची जाहिरात प्रसिद्ध
SHARES

अाॅनलाइन निकालाच्या गोंधळामुळे संजय कुलगुरु यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदावरून उचलबांगडी करण्यात अाल्यानंतर अाता मुंबई विद्यापीठाची अवस्था 'कुणी कुलगुरू देतं का कुलगुरू...' अशीच झाली अाहे. तब्बल दोन महिने प्रभारी कुलगुरुंनी मुंबई विद्यापीठाचा कारभार पाहिला. अाता कुलगुरुपदासाठी मुंबई विद्यापीठानं जाहिरात प्रसिद्ध केली अाहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १४ फेब्रुवारी असल्यानं मार्च महिन्याच्या सुरुवातीला मुंबई विद्यापीठाला नवा कुलगुरु मिळण्याची शक्यता अाहे.


अर्ज इथे पाठवा

कुलगुरुपदासाठीचे अर्ज 14 फेब्रुवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सिडको लिमिटेड, निर्मल, दुसरा मजला, नरिमन पाॅईट, आयनॉक्स थिएटरजवळ, मुंबई-२१ या पत्यावर पाठवावेत, असं आवाहन कुलगुरू निवड समितीनं केलं आहे.


कुलगुरु शोध समितीत कोण?

कुलगुरू निवडीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन हे कुलगुरु शोध समितीचे अध्यक्ष आहेत. तर सदस्य म्हणून श्रीनगर येथील नॅशनल इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. श्यामलाल सोनी आणि सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी या समितीत आहेत. नोडल ऑफिसर म्हणून अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र कुलकर्णी यांची नियुक्‍ती करण्यात अाली आहे.


डाॅ. देवानंद शिंदे यांनी सांभाळली धुरा

मुंबई विद्यापीठाच्या निकालामधील अभूतपूर्व गोंधळाला जबाबदार असलेले आणि तब्बल दीड महिना सक्‍तीच्या रजेवर पाठवलेल्या कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची अखेर कुलगुरु पदावरून हलालपट्टी करण्यात अाली. त्यांना मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी २ वर्ष ३ महिने संधी मिळाली. त्यानंतर आता विद्यापीठाची धुरा प्रभारी कुलगुरु म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी सांभाळली अाहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा