Advertisement

मुंबई विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू पाहिजे, एसएफआयची मागणी

मुंबई विद्यापीठ संकुलातील विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या काॅलेजांतील अनेक विद्यार्थी आपापल्या समस्या घेऊन कुलगुरूंकडे जातात. मात्र कुलगुरूंकडे मुंबई विद्यापीठासोबत दुसऱ्या विद्यापीठाचाही पदभार असल्याने ते बहुतेकवेळा उपलब्ध होत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या तशाच राहतात.

मुंबई विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू पाहिजे, एसएफआयची मागणी
SHARES

मागील शैक्षणिक वर्षातील निकालाचा आणि पुनर्मूल्यांकनाचा इतिहास लक्षात घेता परीक्षा होण्यापूर्वीच खबरदारीचा भाग म्हणून तात्काळ पूर्णवेळ कुलगुरू आणि कुलसचिव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य समितीने केली.


राज्यपालांना निवेदन

यासंदर्भात २८ मार्च २०१७ रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लेखी निवेदन देण्यात आलं आहे. मुंबई विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू आणि कुलसचिव यांची तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास येत्या १० एप्रिल २०१८ पासून मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस या ठिकाणी 'एसएफआय' तर्फे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राज्यपाल आणि शिक्षणमंत्री यांना देण्यात आला आहे.


कुलगुरू अनुपस्थित

मुंबई विद्यापीठ संकुलातील विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या काॅलेजांतील अनेक विद्यार्थी आपापल्या समस्या घेऊन कुलगुरूंकडे जातात. मात्र कुलगुरूंकडे मुंबई विद्यापीठासोबत दुसऱ्या विद्यापीठाचाही पदभार असल्याने ते बहुतेकवेळा उपलब्ध होत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या तशाच राहतात. या सर्व बाबींचा राज्यपालांनी गांभीर्याने विचार करून मुंबई विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू आणि कुलसचिव यांची तात्काळ नियुक्ती करावी, अशी 'एसएफआय'ची मागणी आहे.


अन्यथा बेमुदत उपोषण

आमच्या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अन्यथा येत्या १० एप्रिलपासून मुंबई विद्यापीठ, कालिना कॅम्पस इथं बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल.
- रामेशवर शेरे, सचिव, मुंबई जिल्हा



हेही वाचा-

कुणी कुलगुरू देतं का कुलगुरू... विद्यापीठाची जाहिरात प्रसिद्ध

कुलगुरूंची निवड १५ मार्चच्या आत करा - आशिष शेलार



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा