Advertisement

डॉ. मगरे स्वीकारणार प्र-कुलगुरू पद


डॉ. मगरे स्वीकारणार प्र-कुलगुरू पद
SHARES

मुंबई विद्यापीठात अखेर प्र-कुलगुरूंची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी प्र-कुलगुरुपदी कीर्ती कॉलेजचे प्राचार्य व्ही. एन. मगरे यांची निवड केली आहे.


अनेक रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात 

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची हकालपट्टी झल्यानंतर कुलगुरू या पदाबरोबरच विद्यापीठातील अनेक रिक्त पदे भरण्यास सुरुवात केली आहे. सध्या या पदांवर प्रभारी म्हणून अधिकारी काम बघत आहेत.

मुंबई विद्यापीठात प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून धिरेन पटेल काम बघत होते. आता गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून व्ही. एन. मगरे प्र-कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेतील.


कुलुगुरूपदासाठी समिती स्थापन

याआधी मगरे यांची विद्यापीठाचे प्रभारी रजिस्ट्रारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मगरे यांनी हे पद न स्वीकारल्यामुळे दिनेश कांबळे यांची रजिस्ट्रारपदी निवड करण्यात आली.

आता कुलगुरूपदी कोणाची निवड होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कुलुगुरूपदासाठी डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.



हेही वाचा - 

कुलगुरूपदाच्या शर्यतीत यांचं नाव? वाचा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा