Advertisement

कुलगुरूंची निवड १५ मार्चच्या आत करा - आशिष शेलार


कुलगुरूंची निवड १५ मार्चच्या आत करा - आशिष शेलार
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड १५ मार्चच्या आत करा, ऑनलाईन पेपर तपासणीची स्टँडर्ड ऑपरेशन सिस्टीम तयार करा, त्यासाठी समिती गठीत करा यांसह अनेक मागण्यांसाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली.

भाजप युवा मोर्चाचे शिष्टमंडळ घेऊन आशिष शेलार यांनी शनिवारी राज्यपालांची राजभवनात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात जाऊन शिक्षणमंत्र्यांचीही भेट घेतली.


स्टँडर्ड ऑपरेशन सिस्टीम आवश्यक

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया १५ मार्चच्या आत पुर्ण करून शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच नव्या कुलगुरूंची निवड व्हावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. तसेच यावर्षी ऑनलाईन पद्धतीने पेपर तपासणी करण्यात आली. ती प्रक्रिया सदोष करण्यासाठी त्यांची स्टँडर्ड ऑपरेशन सिस्टीम तयार करण्यात यावी त्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करून त्याची मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, ऑनलाईन पेपर तपासणीबाबत कमिटी गठीत करण्याचं राज्यपालांनी मान्य केलं आहे.

संबंधित विषय