विद्यार्थी विचारताहेत, 'एटीकेटीची परीक्षा द्यायची की नाही'?

एटीकेटीची परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना अजूनही हजारो विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल लागलेलेच नाहीत. त्यामुळे एटीकेटीची परीक्षा द्यायची की निकालाची वाट बघायची असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय.

गेले ७ महिने मुंबई विद्यापीठात सुरू असलेला निकालाचा गोंधळ अजूनही संपलेला नाही. मे मध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल १९ सप्टेंबरला विद्यापीठाने जाहीर केले. मात्र हजारो पुनर्मूल्यांकनाचे निकाल लागणे बाकी आहेत. ८ नोव्हेंबरपासून येत्या एटीकेटीची परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे एटीकेटीची परीक्षा द्यायची की पुनर्मूल्यांकनाच्या निकालाची वाट बघायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे.

लॉ चा निकाल नाहीच

लॉ च्या विद्यार्थ्यांचा निकाल दोन दिवसांत लावावा, असे आदेश न्यायालयाने विद्यापीठाला दिले होते. मात्र न्यायालयाचे आदेश पाळण्यातही विद्यापीठाला अपयश आला. अद्याप लॉ च्या २५ विद्यार्थ्यांचे निकाल लागणे बाकी आहेत.

दोन दिवसांत निकाल लावणार

एटीकेटीच्या परीक्षेच्या आधी पुनमूल्यांकनाचे निकाल लावण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण घेऊ नये. एटीकेटी परीक्षेसाठीचे हॉलतिकीट विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

- अर्जुन घाटुळे, प्रभारी परीक्षा संचालक


हेही वाचा - 

मुंबई विद्यापीठाचे 'दिवस फिरले'! इंजिनीअरींगच्या परीक्षेसाठी 'जून २०१७' चं वेळापत्रक केलं तयार


पुढील बातमी
इतर बातम्या