मुंबई विद्यापीठाचे 'दिवस फिरले'! इंजिनीअरींगच्या परीक्षेसाठी 'जून २०१७' चं वेळापत्रक केलं तयार


  • मुंबई विद्यापीठाचे 'दिवस फिरले'! इंजिनीअरींगच्या परीक्षेसाठी 'जून २०१७' चं वेळापत्रक केलं तयार
SHARE

कुलगुरूंची उचलबांगडी केल्यानंतर तरी मुंबई विद्यापीठातील गलथान कारभाराला ब्रेक लागेल, अशी अपेक्षा होती. पण विद्यापीठ प्रशासन दर दिवशी नवा घोळ घालत असल्याने विद्यार्थ्यांना आता रडावं की वेड्यासारखं हसावं हेच सुचेनासं झालं आहे. विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा नवा नमुना म्हणजे यंदा विद्यापीठाने वेळापत्राकतच घोळ घातला आहे. इंजीनिअरींगच्या परीक्षांचे पेपर विद्यापीठाने जून २०१७ मध्ये घेण्याचं ठरवलं आहे. आता विद्यापीठ त्यासाठी पुन्हा भूतकाळात जाणार का? आणि जाणारच असेल, तर घालून ठेवलेला घोळ तरी सुधारणार का? असा प्रश्न विद्यार्थी एकमेकांना विचारू लागलेत.    


काय आहे प्रकरण?

एकीकडे ऑनलाईन असेसमेंटचा गोंधळ सुरू असताना दुसरीकडे विद्यापीठाने दिवाळीनंतर होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकात घोळ घातला आहे. इंजिनीअरींगच्या सातव्या सत्राच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाने नुकतंच जाहीर केलं आहे. २२ नोव्हेंबरपासून इंजिनीअरींगची सातव्या सत्राची परीक्षा सुरू होणार आहे. या वेळापत्रकात इंजिनीअरींगचे काही पेपर जून २०१७ मध्ये होतील, असं वेबसाईटवर दिलेल्या वेळापत्रकात विद्यापीठाने नमूद केलं आहे. 'इथे' झाला घोळ

मुंबई विद्यापीठाच्या इंजिनीअरींगच्या सिव्हिल इंजिनीअर, मेकॅनिकल इंजिनीअर, इलेक्ट्रीक  इंजिनीअर, काॅम्प्युटर इंजिनीअर अशा सगळ्या शाखांची परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या संदर्भातील ६ पेपरचं सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाने वेबसाईटवर अपलोडही केलं. पहिला पेपर २२ नोव्हेंबरला, दुसरा पेपर २८ नोव्हेंबरला आणि शेवटचा पेपर २२ डिसेंबरला आहे. तुम्ही म्हणाल मधले पेपर गेले कुठे? पण खरा घोळ इथेच २८ नोव्हेंबर नंतरच्या पेपरच्या तारखांमध्ये विद्यापीठाने घोळ घातला आहे. तिसरा पेपर ४ की ११ नोव्हेंबर आहे हे स्पष्ट नाही, तर चौथा पेपर ११ जूनला तर पाचवा पेपर १८ जूनला घेण्यात येईल असं वेळापत्रकात म्हटलं आहे.


जून महिना तर उलटला

जून महिना उलटून ५ महिने झाले तरीही विद्यापीठ जूनमध्ये परीक्षा घेण्याचा विचार करत असेल, तर त्यासाठी भूतकाळात जावं लागेल. विद्यार्थ्यांना तर हे शक्य नाही, त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला हे कसं जमतं तेच बघावं लागेल.  हेही वाचा -

कुलगुरूपदाच्या शर्यतीत यांचं नाव? वाचा

मुंबई विद्यापीठात कोट्यवधी रूपयांचा घोटाळा- डाॅ. मुणगेकरसंबंधित विषय
ताज्या बातम्या