वेबसाईटवरून लिंकच गायब! परीक्षा अर्ज भरायचे तरी कुठे?

विद्यापीठाने अजून मे २०१७ च्या परिक्षांचे निकाल लावले नाहीत आणि लगेच दुसऱ्या सत्रातील परिक्षांची सुरवातही केली आहे. लॉच्या सहाव्या सत्रातील परिक्षांसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. विद्यार्थ्यांना परिक्षा तर द्यायची आहे, मात्र अर्ज भरायला वेबसाईटवर लिंकच उपलब्ध नाहीये.

३ नोव्हेंबरपर्यंत लॉसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. लॉसाठी अर्ज करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज भरण्यासाठी २ नोव्हेंबरला वेबसाईट ओपन केली, पण सव्हर्र डाऊनमुळे विद्यार्थ्यांना अर्जच करता आले नाहीत. त्यानंतर विद्यापीठाकडे धाव घेतली. सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांना आपले अर्ज भरता आले नाहीत. ३ तारीख शेवटची असल्यामुळे आता परिक्षा देताच येणार नाही, अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावू लागली. अखेर विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे यांनी तारीख वाढवून देण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे अर्ज भरण्यासाठी तारीख ६ तारखेपर्यंत वाढवण्यातही आली.

गेले दोन दिवस मी अर्ज भरण्यासाठी लिंक ओपन करत आहे. पण माझा अर्जच भरला जात नाही. वेबसाईटवरून लिंकच गायब झाली आहे. त्यामुळे अर्ज कुठे भरायचा? हा प्रश्न पडलाय. लॉच्या लिंकच्या ठिकाणी कॉमर्ससाठीची लिंक आहे. अर्ज भरण्याची तारीख वाढवली आहे. पण अधिकृत माहिती अद्याप कळलेली नाही.

पूर्वा परब, लॉची विद्यार्थिनी

मात्र, आज ३ नोव्हेंबरला सकाळी अर्ज भरण्यासाठी वेबसाईट सुरू केली असता, वेबसाईटवर अर्ज भरण्यासठी लिंकच उपलब्ध नाहीये. तारीख तर वाढवून दिली, पण लिंकच उपलब्ध नसल्यामुळे आपण अर्ज कसा भरायचा? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय.

विद्यापीठाने लवकरात लवकर लिंक सुरू करावी, विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाहीत तर ते परिक्षा देऊ शकणार नाहीत. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल. त्यामुळे आता विद्यापीठाने ही लिंक सुरू करावी. निकालासाठी तर विद्यापीठ विद्यार्थ्यांचा अंत बघत आहे.

सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल

याबाबत मुंबई विद्यापीठाचे प्रभारी परिक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.


हेही वाचा

लॉच्या 9 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या न्यायालयाच्या सूचना

पुढील बातमी
इतर बातम्या