लॉच्या 9 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या न्यायालयाच्या सूचना


SHARE

न्यायालयात गेलेल्या 6 विद्यार्थ्यांनाच विद्यापीठाने मुदत उलटून गेल्यानंतर प्रवेश द्यायचा निर्णय घेतल्यामुळे आता उर्वरीत विद्यार्थ्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठवायला सुरवात केली आहे. न्यायालयात दाद मागिलतेल्या लॉच्या आणखी 9 विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अशी सूचना न्यायालयाने विद्यापीठाला केली आहे.


काय झालं

ऑनलाईन असेसमेंटच्या निर्णयामुळे लॉ च्या विद्यार्थ्यांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. विद्यापीठाने लॉ च्या जाहीर केलेल्या निकालात 'पुराव्याचा कायदा' या विषयात अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण दिले होते. त्यामुळे त्रासलेल्या सहा विद्यार्थ्यांनी अखेर न्यायालयाचं दार ठोठावलं. न्यायालयाने त्या सहा विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल प्रवेश देण्याची सूचना विद्यापीठाला केली. सुरुवातीला 'सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा,' अशी मागणी न्यायालयात केली होती. न्यायालयाच्या सूचनेनुसार विद्यापीठाने केवळ त्या सहा विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश दिला. उर्वरीत विद्यार्थ्यांचा प्रवेश विद्यापीठाने नाकारला.

त्या सहा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यानंतर आणखी नऊ विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठापुढे याबाबत आज सुनावणी झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी आम्हालाही न्याय द्या, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार न्यायालयाने विद्यापीठाला या विद्यार्थ्यांनाही प्रोव्हिजनल प्रवेश देण्याची सूचना केली आहे. उद्या आणखी दोन लॉ चे विद्यार्थी न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाणार आहेत, असे अॅड उदय वारूंजीकर यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना सांगितले.हेही वाचा

सरासरी गुण देणार, पण कसे?


संबंधित विषय