Advertisement

सरासरी गुण देणार, पण कसे?


सरासरी गुण देणार, पण कसे?
SHARES

न्यायालयाने दिलेली ६ वी डेडलाईन पाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला ४७७ निकाल जाहीर केले. मात्र, उत्तरपत्रिका गहाळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. यासाठी कोणती नियमावली वापरण्यात येईल? हे मात्र विद्यापीठाने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत.


'त्या' विद्यार्थ्यांना सरासरी गुणच!

१९ सप्टेंबरला ४७७ निकाल जाहीर झाले. मात्र १५०० हून अधिक उत्तरपत्रिका गहाळ झाल्यामुळे विद्यापीठाने त्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले होते. शोध घेऊनही त्या उत्तरपत्रिका सापडल्या नाहीत. अखेर विद्यापीठाने त्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला. मात्र ते सरासरी गुण नेमके कोणत्या पध्दतीने देण्यात येणार आहेत? त्या साठी कोणती नियमावली वापरण्यात येईल? हे विद्यापीठाकडून सांगण्यात आलेले नाही.


...म्हणून उत्तरपत्रिका गहाळ झाल्या

उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना त्याचे स्टॅपलर काढून प्रत्येक पान वेगळे करून स्कॅन केले जाते. त्यानंतर त्याचे कोंडिंग केले जाते. या सगळ्या प्रक्रियेत २ हजाराहून अधिक उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाली. त्यातील ४०० उत्तरपत्रिकांचा शोध लागला. मात्र उर्वरीत उत्तरपत्रिकांचा अद्याप शोध लागलेला नाही.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा