एमपीएससीच्या टाॅप २० मध्ये एकटाच मुंबईकर

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) तर्फे विक्रीकर निरीक्षक (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर) या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत ठाणे जिल्ह्यातून प्रमोद त्र्यंबक केदार यांनी मागासवर्गीयांमधून प्रथम क्रमांक पटकावला. तर या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील शिवाजी जाकापुरे यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. सांगली जिल्ह्यातील शितल बंडगर मुलींच्या यादीतून पहिली आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत टॉप २० मध्ये मुंबईचा केवळ एकच विद्यार्थी आहे.

'या' संकेतस्थळावर पहा निकाल

या परीक्षेत शिवाजी जाकापुरे यांना १५६, प्रमोद केदार यांना १४८ तर शीतल बंडगर यांना १४१ गुण मिळाले आहेत. दरम्यान संबंधित निकालाची माहिती https://www.mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची असले त्यांनी १० दिवसांत अर्ज दाखल करता येईल, असं आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे.

कुठल्या पदांसाठी परीक्षा?

सहायक कक्ष अधिकारी/ विक्रीकर निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षक संयुक्त (पूर्व) परीक्षेकरिता ३,३०,९०९ उमेदवारांनी अर्ज केला होता. या परीक्षेला राज्यभरातून एकूण ४ हजार ४३० विद्यार्थी बसले होते. त्यातील २५१ विद्यार्थ्यांची एसटीआय पदासाठी शिफारस करण्यात आली आहे.

ही परीक्षा ७ जानेवारी २०१८ रोजी घेण्यात आली होती. मागील वर्षी सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तीन पदांसाठी राज्यातून ३ लाख ३० हजार ९०९ विद्यार्थी बसले होते. त्यातून ४ हजार ४३० जणांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली होती.


हेही वाचा-

२२ नवीन काॅलेज येणार, अॅडमिशनचा तिढा सुटणार

निकाल गोंधळ पूर्णपणे निस्तरणं हे पहिलं ध्येय - कुलगुरू


पुढील बातमी
इतर बातम्या