Advertisement

२२ नवीन काॅलेज येणार, अॅडमिशनचा तिढा सुटणार

. मुंबईत ६, ठाण्यात ७ कॉलेजांसह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये ही काॅलेज सुरू होणार आहेत. मॅनेजमेंट कौन्सिलने या निर्णयाला मंजुरी दिल्याने पदवी अभ्यासक्रमांच्या हजारो जागा वाढणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अॅडमिशनचा तिढाही सुटणार आहे.

२२ नवीन काॅलेज येणार, अॅडमिशनचा तिढा सुटणार
SHARES

मुंबई विद्यापीठाअंतर्गत २०१८ -१९ या शैक्षणिक वर्षापासून २२ नवीन कॉलेज सुरू करण्यात येत आहेत. मुंबईत ६, ठाण्यात ७ कॉलेजांसह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये ही काॅलेज सुरू होणार आहेत. मॅनेजमेंट कौन्सिलने या निर्णयाला मंजुरी दिल्याने पदवी अभ्यासक्रमांच्या हजारो जागा वाढणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अॅडमिशनचा तिढाही सुटणार आहे.


६२ नव्या कॉलेजचा प्रस्ताव

शैक्षणिक संस्थांनी केलेल्या मागणीनुसार दरवर्षी नवीन कॉलेजचा प्रस्ताव असलेला बृहत आराखडा सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येतो. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने २०१८-१९ या वर्षी विविध अभ्यासक्रमांच्या ६२ नवीन कॉलेजांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यातील २२ कॉलेजांना शासनाने हिरवा कंदील दाखवला असून येत्या शैक्षणिक वर्षात ही नवीन कॉलेज सुरू होणार आहेत. या नवीन कॉलेजांमुळे मुंबई-ठाण्यात विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी होणारी ‘मारामार’ थांबणार आहे.


संलग्न कॉलेजांची संख्या ७९६ वर

गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठाने सादर केलेल्या नवीन कॉलेजांच्या प्रस्तावांपैकी एकही कॉलेज मंजूर न करण्यात आल्याने या शैक्षणिक संस्था मंजूरी मिळण्याच्या प्रतिक्षेत होत्या. मात्र आता या संस्थांना मंजुरी मिळाल्याने संस्थाचालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या नवीन कॉलेजांमुळे मुंबई विद्यापीठ सलग्न कॉलेजांची संख्या ७९६ वर पोहोचली आहे.


मुंबईजवळील नवीन कॉलेजांची नावे

  • एनकेआयएस, वडाळा (पारंपरिक)
  • चेंबूर नाईट कॉलेज, चेंबूर (पारंपरिक, नाईट)
  • ठाकूर रामनारायण, दहिसर (पारंपरिक)
  • लिलावती लालजी दयाल, चर्नी रोड (पारंपरिक, नाईट)
  • पॉल इन्स्टिट्यूट, वांद्रे (पारंपरिक, महिला)
  • धीरजलाल तलकचंद शाह, मालाड (विधी)
    ठाणे
  • पुष्पलता मढवी कॉलेज, भिवंडी (पारंपरिक)
  • एलआर तिवारी, मिरा रोड (पारंपरिक)
  • एलएल दालमिया, मिरा रोड (पारंपरिक)
  • भिवंडी वुमन कॉलेज (महिला, पारंपरिक)
  • इंद्रपाल चौगुले, भिवंडी (विधी)
  • एलआर तिवारी, मिरा रोड (विधी)
  • जीवनदीप कॉलेज, कल्याण (विधी)


या अभ्यासक्रमांचा समावेश

आर्टस्, सायन्स, कॉमर्स या शाखांसाठी ११ कॉलेज स्थापन होणार आहेत. त्यात महिलांसाठी २ तर १ नाइट महाविद्यालय असणार आहे. तसंच लॉ च्या विद्यार्थ्यांसाठीही ७ नवीन कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. तसंच इतर अभ्यासक्रमासाठी १ कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याशिवाय या प्रत्येक कॉलेजमध्ये कमीत कमी ३०० जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्यामुळे नवीन कॉलेजमध्ये ६ ते साडेसहा हजार जागा वाढण्याची शक्यता आहे.



हेही वाचा- 

डाॅ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू

नव्या कुलगुरूंचंही 'टार्गेट रिझल्ट'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा