Advertisement

डाॅ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू

गेल्या वर्षभरापासून मुंबई विद्यापीठाची जबाबदारी प्रभारी कुलगुरूंवर सोपविण्यात आल्याने राज्यातील सर्व विद्यार्थी व शिक्षण विभागाचे लक्ष या मुलाखतीकडे लागले होते. दरम्यान राज्यपालांनी कुलगुरू पदासाठी नियुक्त केलेल्या सुहास पेडणेकरापुढे यांच्यापुढे विद्यापीठाची डागाळलेली प्रतिमा सुधारणं, विद्यापीठात झालेले निकाल गोंधळ व विद्यापीठाचे नॅक मानांकनात सुधारणा करणं यांसारखी विविध आव्हाने असणार आहेत.

डाॅ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड करण्यासाठी अखेर सरकारला शुक्रवारचा मुहूर्त सापडला. रुईया काॅलेजचे प्राध्यापक डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी निवड करण्यात आली आहे.

डाॅ. पेडणेकर रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त काॅलेजच्या प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत. संजय देशमुख यांची हकालपट्टी झाल्यानंतर तब्बल ६ महिन्यांहून जास्त काळ मुंबई विद्यापीठाचं कुलगुरूपद रिक्त होतं. हे पद भरण्याची मागणी सातत्याने विविध शिक्षण संस्थांद्वारा करण्यात येत होती.


कधीपर्यंत नियुक्ती

डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी (दिनांक २७) डॉ. पेडणेकर यांना राजभवन इथं बोलावून नियुक्तीचं पत्र सुपूर्द केलं आहे.


'अशी' पेडणेकर यांची नेमणूक?

मुंबई विद्यापीठातील निकाल गोंधळामुळे तत्कालीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून दूर करण्यात आलं होतं. त्यानंतर नवीन कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवली. या समितीने एका जाहिरातीद्वारे कुलगुरूपदासाठी अर्ज मागवले. त्यानंतर कुलगुरूपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या समितीकडे अर्ज पाठवले. जवळपास १५० ते २०० जणांचे अर्ज या पदासाठी आले होते.


अंतिम ५ जणांची निवड

त्यानंतर या समितीने एकूण अर्जांपैकी फक्त ३२ जणांची निवड करून १३ एप्रिल व १४ एप्रिल या दोन दिवशी नरिमन पॉइंट येथील सिडको भवन इथं त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं. या सर्व मुलाखती पार पडल्यानंतर १४ एप्रिल रोजी अंतिम ५ नावे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवण्यात आली. त्यानंतर राज्यपालांनी ३ दिवसांचा कालावधी देत १९ एप्रिलला या ५ जणांची मुलाखत व कामकाजाबाबत सादरीकरण घेतलं. आणि त्यानंतर या ५ जणांच्या नावातून डॉ. सुहास यांची नवे कुलगुरू म्हणून निवड केली.


कुलगुरूंसाठीही 'तारीख पे तारीख'  

'सरकारी काम तीन महिने थांब', अशी मराठीत म्हण आहे. या म्हणीप्रमाणे विद्यापीठाला कुलगुरू मिळण्यासाठी जवळपास वर्षभर थांबावं लागलं. इतकंच नव्हे, तर राज्यपालांनी अंतिम ५ जणांच्या सादरीकरणानंतर लगेचच कुलगुरूंची घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, १९ एप्रिल व २० एप्रिल या दोन्ही दिवशी सर्वांच्या पदरी निराशाच पडली.


मोठी आव्हाने

गेल्या वर्षभरापासून मुंबई विद्यापीठाची जबाबदारी प्रभारी कुलगुरूंवर सोपविण्यात आल्याने राज्यातील सर्व विद्यार्थी व शिक्षण विभागाचे लक्ष या मुलाखतीकडे लागले होते. दरम्यान राज्यपालांनी कुलगुरू पदासाठी नियुक्त केलेल्या सुहास पेडणेकरापुढे यांच्यापुढे विद्यापीठाची डागाळलेली प्रतिमा सुधारणं, विद्यापीठात झालेले निकाल गोंधळ व विद्यापीठाचे नॅक मानांकनात सुधारणा करणं यांसारखी विविध आव्हाने असणार आहेत.



हेही वाचा-

कुलगुरू कुठला, मुंबईचा की नागपूरचा?

कुलगुरुंच्या शर्यतीत ती ५ नावे कुणाची?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा