Advertisement

कुलगुरूंची निवड १९ तारखेला?

कुलगुरूंची निवड कधी होणार याचं उत्तर मिळवण्यासाठी 'मुंबई लाइव्ह'ने राजभवनाशी संपर्क साधला. तेव्हा राजभवनाकडून अंतिम ५ व्यक्तींची मुलाखत १९ तारखेपर्यंत होण्याची शक्यता असल्याचं स्पष्ट केलं. अंतिम ५ व्यक्ती कोण? याबाबतही राजभवनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

कुलगुरूंची निवड १९ तारखेला?
SHARES

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल, परीक्षा वेळापत्रक गोंधळ, नॅशनल रँकिंगमध्ये केलेली घोर निराशा, ढासाळलेला दर्जा तसंच विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान लक्षात घेता याच आठवड्यात मुंबई विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


काय आहे निवड प्रक्रिया?

मुंबई विद्यापीठातील निकाल गोंधळामुळे तत्कालीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून दूर करण्यात आलं होतं. त्यानंतर नवीन कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवण्यात आली. या समितीने एक जाहिरातीद्वारे कुलगुरूपदासाठी अर्ज मागवले. त्यानंतर कुलगुरूपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज या समितीकडे पाठवले.


५ अंतिम नावांची निवड

जवळपास १५० ते २०० जणांचे अर्ज या पदासाठी आले. त्यानंतर समितीने सर्व अर्जांपैकी केवळ ३२ जणांची निवड करून शुक्रवार १३ एप्रिल व शनिवार १४ एप्रिल असे २ दिवस नरिमन पॉइंट येथील सिडको भवन इथं ३२ जणांच्या मुलाखती घेतल्या. या सर्व मुलाखती पार पडल्यानंतर शनिवारी १४ एप्रिलला अंतिम ५ नावे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवण्यात आली. ही नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आल्यानंतर या ५ उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी ३ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे अंदाजे १९ एप्रिलपर्यंत कुलगुरूंचं नाव निश्चित करण्यात येणार आहे.


राजभवनाकडून कमालीची गुप्तता

कुलगुरूंची निवड कधी होणार याचं उत्तर मिळवण्यासाठी 'मुंबई लाइव्ह'ने राजभवनाशी संपर्क साधला. तेव्हा राजभवनाकडून अंतिम ५ व्यक्तींची मुलाखत १९ तारखेपर्यंत होण्याची शक्यता असल्याचं स्पष्ट केलं. अंतिम ५ व्यक्ती कोण? याबाबतही राजभवनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.



हेही वाचा-

कुलगुरू कसा असावा? यासाठी मनविसेचं राज्यपालांना निवेदन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा