Advertisement

कुलगुरू कसा असावा? यासाठी मनविसेचं राज्यपालांना निवेदन


कुलगुरू कसा असावा? यासाठी मनविसेचं राज्यपालांना निवेदन
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू पदासाठी शुक्रवारी ३२ जणांच्या मुलाखती होणार आहे. दरम्यान कुलगुरुंची निवड करताना ती नॅकच्या मूल्यांकनाचा आढावा घेणारी व्यक्ती असावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसेचे) संतोष गांगुर्डे यांनी केली.

गांगुर्डे यांनी गुरुवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह मुख्यमंत्री आणि शोध समितीकडे या मागणीचं निवेदनही दिलं. या निवदेनामध्ये १४ मुद्दे मांडण्यात आले असून उच्च विद्याविभुषित, शैक्षणिक, प्रशासकीय अऩुभव, संशोधक आणि संघटन कौशल्य असणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यात यावी, अशी विनंतीही राज्यपालांना केली आहे.


असा असावा कुलगुरू

कुलगुरूंची निवड करताना ती व्यक्ती महाराष्ट्र राज्याच्या समाज सुधारक, तसेच थोर पुरूषांचा इतिहास जाणणारी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणारी असावी. त्याशिवाय त्या व्यक्तीला अधिकार क्षेत्रातील ७ जिल्ह्यांचा आर्थिक, व्यवसायिक, कला, क्रीडा, संस्कृती, सामाजिक बांधिलकी, आदीवासी पाड्याचा अभ्यास असावा. मुंबई विद्यापीठाचे सर्व घटक म्हणजे विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक, प्राचार्य, संचालक यांच्या समस्या सोडवणारा तसेच प्रत्येक अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करणारा कुलगुरू असावा. विद्यापीठाच्या कुलगुरूंना विधी आणि न्यायलयाच्या निकालाचे ज्ञान असणे फार गरजेचे असून त्याला मुंबई विद्यापीठाबाबत सर्व माहिती असणे गरजेचं आहे.

मनविसेने दिलेल्या या निवेदनात गांगुर्डे यांनी अनेक मुद्दे मांडले असून राज्यपाल आणि डॉ. कस्तुरीरंगन समिती याचा विचार करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा - 

अखेर मुंबई विद्यापीठाला कुलगुरू मिळणार!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा