Advertisement

मुंबई विद्यापिठाच्या कुलगुरु निवडीसाठी शुक्रवारी मुलाखत


मुंबई विद्यापिठाच्या कुलगुरु निवडीसाठी शुक्रवारी मुलाखत
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या पदासाठी ३२ जणांच्या मुलाखतीला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. ही मुलाखत नरिमन पॉईंट येथील सिडको कार्यालयात होणार असून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती ही मुलाखत घेणार आहे.


राज्यपाल करणार नव्या कुलगुरूंची निवड

शुक्रवार आणि शनिवार असे २ दिवस या मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आले आहेत. शुक्रवारी कुलगुरू पदासाठी ३२ जणांची मुलाखत होणार असून शनिवारी संध्याकाळी अंतिम ५ नावे राज्यपालांकडे सादर करण्यात येतील. त्यानंतर हे सर्वजण राज्यपालांसमोर विद्यापीठाच्या कामकाजाबाबत सादरीकरण करणार आहेत. आणि त्यानंतर राज्यपाल या सर्वांमधून नव्या कुलगुरूंची घोषणा करतील.


नवीन कुलगुरू कोण होणार?

मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी घातलेल्या निकाल गोंधळामुळे राज्यपालांनी तत्कालीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूची जबाबदारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली होती. सध्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षण विभागाचं या मुलाखतीकडे लक्ष लागून राहिलं असून नवा कुलगुरु कोण होणार? विद्यापीठाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचं काम ते करणार का? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे असतील.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा