'....तो अध्यादेश रद्द करा'

राज्य शिक्षण विभागाने २३ ऑक्टोबरला एक अध्यादेश जारी केला. त्या अध्यादेशाला शिक्षकांनी तीव्र विरोध केला आहे. आणि अध्यादेश मागे घेणार नाही, तोपर्यंत अंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे.

काय आहे अध्यादेश?

राज्य शिक्षण मंडळाकडून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना सेवेची १२ वर्ष आणि २४ वर्ष झाल्यानंतर शिक्षकांची निवड श्रेणी जाहीर कली जाते. त्या श्रेणीनुसार शिक्षकांना बढती आणि वेतन दिले जाते. अध्यादेशानुसार ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळेला अ श्रेणी मिळाली असेल, त्या शाळेतील शिक्षकांना ही श्रेणी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे माध्यमिक शाळांमध्ये ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर शिक्षकांना श्रेणी देण्यात येणार आहे.

मुंबईसह राज्यभरात अांदोलन

या अध्यादेशाविरोधात मुंबईसह राज्यभरात आंदोलनं करण्यात आली आहेत. 'हा अध्यादेश रद्द होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार' असा इशारा शिक्षक संंघटनेने दिला आहे. या आधी दोन वेळा शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरमध्येही या अध्यादेशाची होळी करून शिक्षकांनी निषेध व्यक्त केला आहे.


हेही वाचा

हे तर उलटंच, शिक्षकांचं भवितव्य आता विद्यार्थ्यांच्या हाती

पुढील बातमी
इतर बातम्या