Advertisement

हे तर उलटंच, शिक्षकांचं भवितव्य आता विद्यार्थ्यांच्या हाती


हे तर उलटंच, शिक्षकांचं भवितव्य आता विद्यार्थ्यांच्या हाती
SHARES

देशाची भावी पिढी घडविण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांवर आहे, त्या शिक्षकांचं भवितव्य आता विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर अवलंबून असणार आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयावर सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

   

८० टक्क्यांहून जास्त  

राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना १२ आणि २४ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणारी वरीष्ठ आणि निवड श्रेणी आता विद्यार्थ्यांच्या टक्क्यांवर अवलंबून राहणार आहे. यापुढे ज्या शाळेतील १० वीचा निकाल ८० टक्क्यांहून जास्त असेल त्याच शाळेतील शिक्षकांना वरची श्रेणी मिळणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने नवीन निकष जारी केले आहेत.


नवे निकष

जे शिक्षक यासाठी पात्र आहेत, त्यांच शिक्षकांची यादी जाहीर केली जाते. त्यानंतर त्या शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांना श्रेणी जाहीर केली जाते. मात्र या वर्षीपासून नव्या निकषांची घोषणा जीआरच्या माध्यमातून केली आहे. या नव्या जीआरनुसार ज्या शाळा 'ए' ग्रेड मध्ये आहेत. त्यांनाच प्रशिक्षण आणि श्रेणी देण्यात येणार आहे. माध्यमिक शाळांमध्ये ज्या शाळेचा १० वीचा निकाल ८० टक्के आहे, त्याच शाळेतील शिक्षकांना ही श्रेणी देण्यात येणार आहे.


शिक्षक संघटनाचा विरोध

वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी हा शिक्षकांचा अधिकार आहे. शिक्षकांना वेतन श्रेणी मिळूच नयेत या पद्धतीने या अटी घालण्यात आल्या आहेत. या अटी रद्द कराव्यात, आशी मागणी आम्ही करत आहोत.
- अनिल बोरनारे, अध्यक्ष, शिक्षण परिषद



हेही वाचा -

शिक्षकांना ३ वर्षांत सेवा सातत्य मिळणार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा