शिक्षकांना ३ वर्षांत सेवा सातत्य मिळणार


SHARE

शिक्षण सेवकांचा ३ वर्षांचा कालावधी पूर्ण होताच त्यांना त्वरित सेवासातत्य द्यावेत, असे आदेश गुरूवारी मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.

शिक्षण सेवकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवासातत्य देऊन नियमीत वेतनश्रेणी मिळण्यासाठी लेखाधिकारी कार्यालयाकडून विलंब होत असल्याची तक्रार शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी मुंबई विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे ३१ ऑगस्ट रोजी केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने गुरूवारी शिक्षण उपसंचालकांनी मुंबईतील पश्चिम, दक्षिण व उत्तर विभागाच्या शिक्षण निरीक्षक तसेच पश्चिम, दक्षिण व उत्तर विभागातील लेखाधिकारी कार्यालयांना आदेश दिले आहेत.

लेखाधिकारी कार्यालयांना केवळ वेतन निश्चिती व पडताळणीचे अधिकार असून लेखाधिकारी कार्यालयाकडून शिक्षण सेवकांची नियुक्ती प्रक्रिया, जाहिरात तसेच अन्य बाबींची चौकशी करून शाळांना व शिक्षण सेवकांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होत होता. यामुळे शिक्षण सेवकांना सेवासातत्य मिळून नियमित वेतनश्रेणीत येण्यासाठी विलंब लागत होता.


शाळांनी शिक्षण सेवकांचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यावर त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे तसेच शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार ही कार्यवाही एक महिन्याच्या आत होणे अपेक्षित असतानाही विलंब का होतो? असा प्रश्न उपस्थित करीत शिक्षणमंत्र्यांकडे याबाबत आम्ही तक्रार करणार आहोत.
- अनिल बोरनारे, मुंबई विभाग प्रमुख, शिक्षक परिषदडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय