ठाणे - ग्रामीण भागातील शाळा लवकरच सुरू करण्याचे आदेश

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील शाळा लवकरच सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा तसंच आश्रमशाळा येत्या २७ जानेवारी पासून सुरू करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.

सुरुवातीला राज्य सरकारच्या आदेशानुसार, ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी १६ जानेवारीपर्यंत बंद होत्या. नंतरही शाळा बंदी वाढवण्यात आली. पण आता ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या पाचवी ते बारावी पर्यतच्या शाळांसह आश्रमशाळा सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा जिल्ह्यातल्या शहरी भागातल्या शाळांसाठी हा निर्णय आणि आदेश लागू नाही. शिंदे यांनी केवळ ग्रामीण भागातल्या शाळांसाठी २७ जानेवारीपासून वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शहरी भागांतील सर्व शाळांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.

अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील शाळांबाबत वेगळे निर्देश देण्यात येतील. शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल असंही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा

दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

JEE मेन्स परीक्षेसाठी ७५ टक्के गुणांची अट रद्द

पुढील बातमी
इतर बातम्या