खासगी शाळांतील शिक्षक भरती अाता सरकारकडून

  • मुंबई लाइव्ह टीम & प्रशांत गोडसे
  • शिक्षण

राज्यातील रखडलेल्या खासगी शाळांमधील अनुदानित शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही शिक्षक भरती अाता राज्य सरकार करणार आहे. दर वर्षी मे महिन्यामध्ये या जागा भरणार असल्याचा निर्णय सरकारने जाहीर केला अाहे. भविष्यात शिक्षक होणाऱ्या तरुणांसाठी सरकारचा या निर्णय खूश करणारा अाहे. तर शिक्षण क्षेत्रातील शिक्षणमहर्षींसाठी हा मोठा झटका असणार अाहे. या भरती प्रक्रियेतून अल्पसंख्याक वर्गाच्या शाळांना मात्र वगळलं आहे.

पवित्रमार्फत भरती

खासगी अनुदानित शिक्षक भरती 'पवित्र' या वेब पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे. सरकारने यापूर्वीच  २३ जून २०१७ रोजी हा निर्णय घेतला होता. मात्र, यामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या.  त्यामुळे या भरतीची अंमलबजावणी सरकारला करता आली नाही. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त ही भरती प्रक्रिया पूर्ण करतील.

दोन वेळा भरती 

या निर्णयामुळे शिक्षण सेवकांना कोणत्या संस्था मिळेल यावर देखील सरकारचं नियंत्रण असेल. तर समायोजन झाल्यानंतर वर्षातून दोन वेळा शिक्षणसेवकांची भरती होणार अाहे. राज्य सरकार बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित शिक्षणसेवकांची खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र शाळांत नियुक्ती करतील. 


हेही वाचा - 

मुंबई विद्यापीठात भरला योगाचा तास

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ कधीपर्यंत? वाचा.


पुढील बातमी
इतर बातम्या