Advertisement

मॅनेजमेंट कॉलेजांमध्ये प्रवेश राज्यस्तरीय कोट्यानुसार

अनेक कॉलेजांमध्ये १५ टक्के प्रवेश 'ऑल इंडिया' कोट्यानुसार राखीव ठेवण्यात येतात. त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता असल्याने राज्य तंत्रशिक्षण संचलनालयाकडे ही मागणी करण्यात आली आहे.

मॅनेजमेंट कॉलेजांमध्ये प्रवेश राज्यस्तरीय कोट्यानुसार
SHARES

राज्यातील स्वायत्त दर्जाप्राप्त मॅनेजमेंट कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी १०० टक्के राज्यस्तरीय कोट्यानुसारच करण्यात यावं, अशी मागणी सोमवारी युवा सेनेतर्फे करण्यात आली. अनेक कॉलेजांमध्ये १५ टक्के प्रवेश 'ऑल इंडिया' कोट्यानुसार राखीव ठेवण्यात येतात. त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता असल्याने राज्य तंत्रशिक्षण संचलनालयाकडे ही मागणी करण्यात आली आहे.


कधीपर्यंत अर्ज?

राज्यातील व्यवस्थापन कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी २१ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या २५ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार 'ऑल इंडिया' कोट्यासाठी १५ टक्के जागा राखीव ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. 

परंतु याचा राज्यातील विद्यार्थ्यांना फटका बसणार असल्याने युवा सेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्य तंत्रशिक्षण संचलनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांची भेट घेऊन १०० टक्के जागा राज्यातूनच भरण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात साईनाथ दुर्गे, प्रदीप सावंत, महादेव जगताप, प्रवीण पाटकर व इतर सिनेट सदस्यांचा समावेश होता.


१५ टक्के कोट्याचा चुकून उलेख

राज्यातील स्वायत्त दर्जाप्राप्त व्यवस्थापन कॉलेजांमध्ये १०० टक्के प्रवेश राज्यस्तरावरच होत असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयातील सूत्रांकडून देण्यात आली. राज्य सरकारतर्फे २०१७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या निर्णयात १५ टक्के 'ऑल इंडिया' कोट्याचा चुकून उल्लेख करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.



हेही वाचा-

अकरावी हेल्पलाइनलाच हवी हेल्प, हेल्पलाइन नंबरच चुकीचे

आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा