IIT Bombay : विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा

एका 18 वर्षीय IIT बॉम्बे (IIT Bombay)  विद्यार्थ्याने रविवारी, 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजता त्याच्या वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी (Suicide case) मारली. आयआयटी बॉम्बे मधल्या अनेक विद्यार्थ्यांनी कॅम्पसवर कँडल मार्च (Candle March) काढत याचा निषेध केला.

केमिकल इंजिनीअरिंग विभागात असलेल्या दर्शन सोळंकी या १८ वर्षीय विद्यार्थ्याने आयआयटी बॉम्बेमध्ये केवळ तीन महिने पूर्ण केले होते. आता याबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आयआयटी बॉम्बेमध्ये जातीय भेदभावाचा आरोप विद्यार्थी गटाने केला आहे

पोलीस (Mumbai Police) सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दर्शन सोळंकी हा अनुसूचित जाती समाजातील असल्याने एका विद्यार्थी गटाने जातीभेदाचा आरोप केला आहे.

"आम्ही 18 वर्षीय दलित विद्यार्थी, दर्शन सोलंकी, याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करतो. आपण हे समजून घेतले पाहिजे की ही वैयक्तिक/वैयक्तिक समस्या नसून संस्थात्मक हत्या आहे," असा आरोप विद्यार्थ्यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात एक ट्विट करत मोठा आरोप करण्यात आला आहे.

"आमच्या तक्रारी असूनही, संस्थेने दलित बहुजन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जागा सर्वसमावेशक आणि सुरक्षित बनविण्याकडे लक्ष दिले नाही. आरक्षणविरोधी भावना आणि पात्र नसलेल्या आणि गैर-गुणवंतांच्या टोमणेने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. उपेक्षितांमधील प्राध्यापक आणि समुपदेशकांच्या प्रतिनिधित्वाचा अभाव आहे,” APSSC द्वारे ट्विटमध्ये म्हटले आहे.

पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागे शैक्षणिक दबाव हे एक कारण असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


हेही वाचा

दहावी-बारावी परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय

पुढील बातमी
इतर बातम्या