परीक्षा बुडालेल्या विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा होणार

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

आठवडाभर दडी मारलेल्या पावसानं जुलै महिन्याच्या सुरूवातीला दणक्यात सुरूवात केली आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू असणारा मुसळधार पाऊस आणि त्यातच अंधेरी पुलाची दुर्घटना यामुळं अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली. या विद्यार्थ्यांना अाता विद्यापीठानं दिलासा दिला अाहे.  येत्या काही दिवसात त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनानं दिली.

या परीक्षा होत्या आज

मुंबई विद्यापीठाच्या सकाळ, दुपारच्या सत्रात ३ प्रॅक्टिकल परीक्षेसह सहा लेखी परीक्षा घेण्यात आल्या. यात एमएससी सेमिस्टर ३ आणि ४, एमसीए सेमिस्टर ६, एलएलबी सेमिस्टर १, एटीकेटी, एमए सेमिस्टर तीन, एलएलबी सेमिस्टर ५ यांसह विविध विषयांच्या परीक्षा घेण्यात आल्या.  या सर्व परीक्षांना गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांनी पूर्नपरीक्षा लवकरच घेतली जाणार असून या परीक्षांचं वेळापत्रकही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.  पावसामुळं आणि पूल दुर्घटनेमुळे शाळांमध्ये अनेक शिक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे  दक्षिण मुंबईतील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तसंच सकाळच्या सत्रातील काही शाळा तासाभराने सोडण्यात आल्या.

विविध ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचता आलं नाही. त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे.  या परीक्षांचं वेळापत्रकही लवकरच जाहीर करण्यात येईल

- विनोद माळाळे , उपकुलसचिव, जनसंपर्क अधिकारी मुंबई विद्यापीठ


हेही वाचा -

विद्यापिठाचा असंवदेनशील कारभार : अपंग विद्यार्थ्याचे प्रॅक्टिकल पेपर घेण्यास नकार


 

पुढील बातमी
इतर बातम्या