SSC आणि HSC च्या अभ्यासक्रमात कपात करण्याची शिक्षकांची मागणी

कोरोनाव्हायरसची वाढती संख्या लक्षात घेता शिक्षकांनी पुन्हा एकदा SSC आणि HSC परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होतोना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. त्यात दीर्घ कालावधीसाठी शाळा बंद राहू शकतात.

मागील वर्षी, राज्य शिक्षण विभागानं SSC आणि HSC बोर्ड परीक्षांसाठी २५ टक्के अभ्यासक्रमाची कपात जाहीर केली होती. दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये इयत्ता ५ ते ८ पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की सुमारे ८५ टक्के शाळांनी पुन्हा वर्ग सुरू केले आहेत.

शिवाय पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती सुमारे ३० टक्के होती. तथापि, मुंबई शहर, उपनगरे आणि पुण्यासह राज्यातील काही भागातील शाळांमध्ये अद्याप कामकाज सुरू झाले नाही.

२३ नोव्हेंबरपासून राज्यात ९ वी ते १२ वीच्या वर्गांना परवानगी दिली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २७ जानेवारीपासून इयत्ता ५ वी ते ८चे वर्ग सुरू करण्यात आले. शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला. त्या अनुषंगानं बऱ्याच जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्या.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात covid 19 च्या वाढीच्या दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारनं रविवारी, २१ फेब्रुवारी रोजी पुण्यात रात्रीचा कर्फ्यू लावला.

महाराष्ट्र राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, राज्य सरकार अनेक जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार करीत आहे. “निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येईल.”


हेही वाचा

अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण, मुंबई विभागातून २ लाख २३ हजार प्रवेश निश्चित

पालक संघटनेचं शिक्षण विभागाविरोधात आझाद मैदानात आंदोलन

पुढील बातमी
इतर बातम्या