पालिका शाळा विद्यार्थ्यांना नवा गणवेश, निळ्याऐवजी ‘या’ रंगाचा पोषाख

मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळांतील विद्यार्थ्यांचा (School Student) गणवेश येत्या शैक्षणिक वर्षांपासून बदलण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून असलेला निळ्या रंगाचा गणवेश बदलून त्याऐवजी क्रीम कलर गणवेश देण्यात येणार आहे. हा गणवेश १५ सदस्यांच्या समितीने निश्चित केला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून निळ्या रंगाची पॅण्ट, त्यावर निळय़ा रेघा असलेला शर्ट आणि टाय असा विद्यार्थ्यांसाठी, तर पाचवीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी निळ्या रंगाचा झगा (फ्रॉक), तर मोठय़ा वर्गातील मुलींसाठी याच रंगाची सलवार कमीज असा गणवेश आहे. सध्याच्या गणवेशात टायचा समावेश असून नव्या गणवेशात त्याला पर्याय देण्यात आला आहे.

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, टाय घालणे अनेक विद्यार्थ्यांना सोयीचे वाटत नाही. काही विद्यार्थी टाय लावून येत नाहीत, तर कधी टाय कुठेतरी एका बाजूला गेलेला असतो. त्यामुळे टायऐवजी नव्या गणवेशात कापडी पट्टी देण्यात आली आहे.

एसएससी मंडळाव्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या शाळाही पालिकेने सुरू केल्या आहेत. आता शिक्षण विभागाने गणवेश बदलाची प्रक्रियाही सुरू केली होती. त्यातून आता नवीन गणवेश निश्चित केल्याची माहिती शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

येत्या शैक्षणिक वर्षांत हा नवा गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात येईल. नवीन गणवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने १५ सदस्यांची समिती नेमली होती. यात पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरच खाजगी ड्रेस डिझायनरचाही समावेश करण्यात आला होता.


हेही वाचा

स्कूल बसमध्ये GPRS बसवणं अनिवार्य, अप्पर पोलीस महासंचालकांच्या सूचना

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, 'असा' भरा अर्ज?

पुढील बातमी
इतर बातम्या