Advertisement

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात, 'असा' भरा अर्ज?

प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्यासाठी आजपासून सुरुवात होणार आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात, 'असा' भरा अर्ज?
SHARES

मुंबई, पुणे (Pune) , पिंपरी चिंचवड, नाशिक (Nashik), अमरावती, नागपूर (Nagpur) या विभागांमध्ये अकरावी ऑनलाईन (11th Admission) प्रवेशाची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्यासाठी आजपासून सुरुवात होणार आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवायचा आहे. तसेच अकरावी प्रवेशाचा भाग 1, ऑनलाइन शुल्क आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायचं आहे. तर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग-2 भरायचा आहे. पण हा अर्ज भाग 1 भरायचा कसा? जाणून घ्या.

अर्ज भाग 1 कसा भरायचा?

  • विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे.
  • लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून इयत्ता 11वी प्रवेशासाठीच्या अर्जाचा भाग 1 भरायचा आहे.
  • ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करायचा.
  • अर्ज प्रमाणित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्र निवडायचं आहे.
  • मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित करून घ्यायचा आहे.
  • प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि भाग 1 भरण्याचं वेळापत्रक, जाणून घ्या

काय आहे प्रोसिजर?

  • ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि प्रवेश अर्ज 1 भरणं, अर्ज प्रमाणित करणे (ऑनलाईन अर्ज करून विद्यार्थ्यांनी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळविणे तसेच अकरावी प्रवेशाचा भाग 1 भरणं, ऑनलाईन शुल्क भरणं, अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रं निवडणं)
  • विद्यार्थ्यांनी भरलेल्या माहितीचा अर्ज तपासून प्रमाणित करणं 30 मे 2022 पासून ते राज्य मंडळाच्या निकालापर्यंत
  • उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आपली माहिती तपासून अंतिम करणं
  • शिक्षण उपसंचालकांनी शाळा / कनिष्ट महाविद्यालयांची माहिती तपासून देणं
  • दहावीच्या निकालानंतर - विद्यार्थ्यांनी राजाचा भाग 2 भरून प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची पसंतीक्रम नोंदविणं तसेच कोटांतर्गत राखीव जागवरील प्रवेशासाठी पसंतीची महाविद्यालये निवडणे आणि ऑनलाईन नमूद करणं



हेही वाचा

HSC & SSC Result 2022 : दहावी आणि बारावीचा निकाल 'या' तारखांना जाहीर होणार

आता पालिका शाळांमध्ये देणार अग्निसुरक्षा आणि बागकामाचे धडे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा