Advertisement

HSC & SSC Result 2022 : दहावी आणि बारावीचा निकाल 'या' तारखांना जाहीर होणार

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती देखील बोर्डाने दिली आहे.

HSC & SSC Result 2022 : दहावी आणि बारावीचा निकाल 'या' तारखांना जाहीर होणार
SHARES

10 जूनपर्यंत बारावीचा तर 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती बोर्डाने दिली आहे. 

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती देखील बोर्डाने दिली आहे. 

"दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल," अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती. परंतु जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा