School Reopen : पहिली ते चौथी इयत्तेच्या शाळा सुरू होण्याची शक्यता

आता प्राथमिक शाळाही लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्यातील इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक आहेत. पुन्हा शाळा सुरू करण्यावर जोर असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, मुक्यमंत्री, मंत्रीमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, वर्षा गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली. या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (CEO) बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा,त्याअनुषंगाने तयारी,लसीकरण आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला.

या बैठकीत जवळपास सगळ्याच जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, राज्यात ४ ऑक्टोबरला तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या. राज्यभरात या निमित्तानं शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. यात ५वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर २० ऑक्टोबरपासून महाविद्यालयेदेखील सुरू झाली आहेत.


हेही वाचा

ठाण्यातल्या 'या' दोन महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू

राज्यातील सर्व सरकारी-खासगी महाविद्यालयांत सोमवारपासून लसीकरण

पुढील बातमी
इतर बातम्या