टीवाय बीकॉमचा पेपरही फुटला

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

१० वी आणि १२वी पेपरफुटी प्रकरण आताशी कुठे निवळलं असतानाच बुधवारी मुंबई विद्यापीठाचा टीवाय बीकॉमचा पेपरही व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागच्या चिंतेत दुप्पट वाढ होताना दिसत आहे.

पेपर कुणी केला व्हायरल?

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांना सुरुवात झाली असून बुधवारी टीवाय बीकॉमचा 'अप्लाय कंपोनट अॅण्ड एक्स्पोर्ट मार्केट' या विषयाचा पेपर होता. ११ वाजता हा पेपर सुरू होणार होता. परंतु त्याअाधिच साधरण १०.३० च्या सुमारास एका कोचिंग क्लासद्वारे हा पेपर व्हाट्सअॅपवर व्हायरल केला गेला.

अद्याप कोणतीही तक्रार नाही

या प्रकरणाची अद्याप कोणतीही तक्रार विद्यापीठकडे आली नसल्याने 'पेपर सुरू होण्याआधी पेपरफुटी झाली, असं म्हणता येणार नाही. विद्यापीठाने प्रश्नपत्रिकेवर वॉटर मार्क छापण्याची सुरुवात केली असून या सर्व प्रकाराचा छडा लवकरच लागेल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे देण्यात आली आहे.


हेही वाचा

दहावी पेपरफुटी: मुंब्य्रातून शिक्षकाला अटक

पुढील बातमी
इतर बातम्या