‘नेट’ परीक्षाही पुढे ढकलली

महविद्यालय आणि विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. देशभरात कोरोनाचा प्रार्दुभाव वेगाने वाढत असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 

यूजीसीच्या वतीने नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) नेट परीक्षा घेतली जाते. यंदा २ ते १७ मेदरम्यान ही परीक्षा होणार होती.  मात्र, कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती एनटीएने वेबसाइटद्वारे जाहीर केली आहे. 

या परीक्षेची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, परीक्षेपूर्वी पंधरा दिवस ही तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ‘एनटीए’मार्फत आपल्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.nta.ac.in या संकेतस्थळावर माहितीसाठी भेट देण्याचं, तसेच विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास, त्यांनी या इमेल आयडीवर संपर्क साधण्याचं आवाहन एनटीएने केलं आहे. या परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अधिक माहिती घेण्यासाठी एनटीएचा हेल्पलाईन क्रमांक ०११-४०७५९००० यावर विद्यार्थी संपर्क साधू शकतात.

यूजीसी-नेट वर्षातून दोन वेळा घेण्यात येते. गेल्या जून २०२० मध्ये ती घेण्यात येणार होती, परंतु कोरोनामुळे ती सप्टेंबर आणि नंतर डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर पुन्हा पुढे ढकलून २ मे रोजी घेण्यात येणार होती.


हेही वाचा -

अखेर राज्यातील दहावीची परीक्षा रद्द, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर


पुढील बातमी
इतर बातम्या