'यूपीएससी'ची पूर्वपरीक्षा कोरोनामुळं लांबणीवर; आता होणार १० ऑक्टोबरला

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने अनेक परीक्षा या रद्द अथवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ आता UPSC ची पूर्वपरीक्षा देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा कोरोनामुळं लांबणीवर गेली आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर २७ जूनला होणारी पूर्वपरीक्षा आता १० ऑक्टोबरला होणार आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा येत्या २७ जूनला होणार होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. १० ऑक्टोबरला आता ही परीक्षा होणार आहे. गेल्या वर्षी परीक्षा ३१ मे ते ४ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आली होती.

आतापर्यंत मुख्य लेखी परीक्षा संपली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुलाखती रोखण्यात आल्या होत्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसाठी अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या निवडीची ९ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लांबणीवर पडलेल्या परीक्षांच्या तारखा निशअचित झाल्यावर उमेदवारांना त्याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. ५ मेपासून सुरू होणाऱ्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेची नोंदणीही आयोगाने पुढे ढकलली आहे.


हेही वाचा -

वाशी, ऐरोली, नेरुळ पालिका रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारासाठी ओपीडी

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेकडून बोटीची खरेदी


पुढील बातमी
इतर बातम्या