मी टू चळवळीत विविध क्षेत्रातील महिला अापल्यावर झालेल्या अत्याचारांविरोधात अावाज उठवत अाहेत. मात्र, अाता एक खोटा मेसेजही व्हायरल झाला अाहे. तो मेसेज अाहे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबत. माजी मिस इंडिया अाणि अभिनेत्री सयाली भगत हिने अमिताभ बच्चन यांनी अापल्याशी गैरवर्तन केले, अशा काही वर्षांपूर्वी व्हायरल झालेल्या मेसेजची पुन्हा चर्चा रंगली.
या अारोपाचा मेसेज बुधवारी पुन्हा व्हायरल झाला अाणि एकच खळबळ उडाली. मात्र, त्यानंतर सयालीने अापण हा अारोप केला नसल्याचा खुलासा केला अाहे. मी बीग बींवर गैरवर्तनाचे अारोप केलेले नाहीत. अामची बदनामी थांबवा, अशी विनंतीही सयालीनं केली.
पब्लिसिटी टीमकडून व्हायरल
२०११ मध्ये दी विकेंड या सिनेमाच्या लाँचिंगला अमिताभ बच्चन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी बच्चन यांच्या पाया पडताना त्यांनी अापल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, असा मेसेज त्यावेळी सयालीच्या नावाने व्हायरल झाला होता. त्यानंतर अमिताभ यांनी पोलिसांची मदत घेतल्यानंतर सायबर क्राईमचं हे प्रकरण असल्याचं उघडकीस अालं होतं. अापल्या परवानगीशिवाय अगोदरच्या पब्लिसिटी टीमने हा मेसेज व्हायरले केल्याचं सांगत सयालीने यावेळी अमिताभ यांची माफी मागितली होती.
खोटी प्रेस नोट
बुधवारी पुन्हा या अारोपाची चर्चा रंगली. सयालीच्या नावाने अमिताभ यांच्यावर अारोप कऱणारा मेसेज व्हायरल झाला. त्यानंतर सयालीने खोटी प्रेस नोट काढून माझ्या नावाने फिरवण्यात अाल्याचं म्हटलं अाहे. माझ्या नावानेही कुठलीही बातमी चालवू नका अशी विनंतीही तिने केली अाहे. २०११ मध्ये सायबर क्राईमच्या केसमध्ये न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिला होता, असं सयालीनं म्हटलं अाहे.
हेही वाचा -
#Metoo: आलोक नाथ अाणखी अडचणीत; संध्या मृदूल यांचाही गैरवर्तनाचा अारोप
#Metoo: नाना पाटेकरनंतर कैलाश खेर, विकास बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप